बऱ्हाणपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व डास मच्छर मुक्तीसाठी सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्या पुढाकारातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन चेंबर व गटारीमध्ये फवारणी केली. कोरोना संकट काळामध्ये गावातील सांडपाण्यावर डास बसून रोगराई होऊ नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने काळजी घेण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी सरपंच संतोष हालोळे, ग्रामसेवक पाचंगे, ग्रामपंचायत सदस्य दीपक बनसोडे, मैनू पटेल, गफार पिरजादे, मा.तं.अ. युसूफ पटेल, श्रावण बनसोडे, महंमद पिरजादे, राजकुमार हालोळे, हारून पटेल, शाहेद मनियार, नासिर पिरजादे, सुरेश बनसोडे, अशपाक शेख, अर्जुन बंदीछोडे उपस्थित होते.
--
फोटो : २३ ब-हाणपूर
ब-हाणपूर येथे जंतुनाशक फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी