शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदासाठी माने, पाटील अन् तुषार दोशींची चर्चा

By appasaheb.patil | Updated: September 23, 2020 12:18 IST

ग्रामीण पोलीस दल; मनोज पाटील शुक्रवारी नगरला जातील

सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची १७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली़ मात्र त्यांच्या जागी कोण पोलीस अधीक्षक पदाचा भार घेणार याची सोलापूरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी़ आऱ पाटील व तुषार दोशी या तिघांपैकी एका अधिकाºयाची सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधीक्षक या पदावर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शासनाने गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात मनोज पाटील यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आल्याचा उल्लेख  होता़ मात्र सोलापूरच्या रिक्त झालेल्या अधीक्षक पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती़ दरम्यान, बदलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवार, २३ सप्टेंबर रोजी अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगितले होते.

 २१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या सोलापूर बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाटील यांनी आपला पदभार दोन दिवस लांबणीवर टाकला होता़ दरम्यान, आता शुक्रवारनंतरच अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले़ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दि. १ आॅगस्ट २०१८ रोजी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलाचा पदभार घेतला होता. दोन वर्षे ५२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली़ मनोज पाटील हे १८ वे पोलीस अधीक्षक होते.

तिघांनाही सोलापूरचा अनुभव सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पदासाठी सध्या लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी़ आऱ पाटील, तुषार दोशी यांचीही नावे चर्चेत आहेत़ राजेंद्र माने, पी़ आऱ पाटील व तुषार दोशी या तीन अधिकाºयांनी यापूर्वी सोलापुरात विविध पदांवर आपली सेवा बजावली आहे़ या तीन अधिकाºयांना सोलापूरच्या गुन्हेगारी, राजकीय पार्श्वभूमीची माहिती आहे़  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस