शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वाद जागामालक अन् भाडेकरूंचा; सोलापुरच्या नवीपेठेतील जीव धोक्यात ग्राहकांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:59 AM

अनेक जुनी बांधकामे धोकादायक : कागदी घोडे नाचवत महापालिकेकडून केवळ नोटिशीचा फार्स

ठळक मुद्देशहरात २३९ इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपा दप्तरी महापालिकेने धोकादायक इमारतींच्या मालकांना केवळ नोटीस देण्याचा फार्स केला कागदी घोड्यांच्या खेळात नवीपेठेत येणाºया ग्राहकांचा जीव मात्र धोक्यात

राकेश कदम। 

सोलापूर : नवीपेठेतील इंडिया जनरल स्टोअर्सच्या इमारतीच्या वरच्या मजल्याचा काही भाग रविवारी रात्री कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र नवीपेठ आणि परिसरात असे १० हून अधिक धोकादायक इमारती असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने इमारतींच्या मालकांना केवळ नोटीस देण्याचा फार्स केला आहे. कागदी घोड्यांच्या खेळात नवीपेठेत येणाºया ग्राहकांचा जीव मात्र धोक्यात आहे. 

शहरात २३९ इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपा दप्तरी आहे. दत्त चौकाच्या कोपºयापासून नवीपेठेच्या पार्किंगपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर सहा इमारतींचे मजले जीर्ण झाले आहेत. इमारतीवर झाडे उगवली आहेत. तरीही त्यात दुकाने सुरू आहेत. फॅशन कॉर्नरच्या बाजूला आणखी एका इमारतीचा मजला जीर्ण अवस्थेत आहे. त्यावर एका मोबाईल कंपनीचा भला मोठा बोर्डही डकविण्यात आला आहे.

नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय पुकाळे म्हणाले, नवीपेठ ही गावठाण भागात विकसित झालेली बाजारपेठ आहे. येथे अनेक जुन्या वाड्यांचा व्यवसायासाठी वापर होत आहे. मातीने बांधलेल्या अनेक इमारती आहेत. अनेक पावसाळे झेलून काही इमारतींच्या दर्शनी भागाची पडझड झाली आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे मनपा कारवाईत अडथळे येतात. उद्या एखाद्या ग्राहकाचा बळी गेला तर त्याला कोण जबाबदार? काळाची गरज ओळखून काही इमारतींबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कालच्या घटनेनंतर व्यापारी आणि ग्राहकही चिंतेत आहेत. 

ग्राहकांची ये-जा सुरू असताना पाडकाम...

  • - रविवारी रात्री इमारत कोसळल्यानंतर नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्यासह बांधकाम विभागातील अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रविवारी रात्री काही भाग हटविण्यात आला. सोमवारी सकाळी जेसीबीच्या सहायाने काही भाग पाडण्यात आला. दुपारी वर्दळ सुरू असताना मनपाचे कर्मचारी विटा, पत्रे हटविण्याचे काम करीत होते. इमारतीच्या आजूबाजूला दक्षतेचे फलक लावलेले नव्हते. सायंकाळी वेल्डर पत्रा कापून काढत होता तेव्हा शेजारी रस्त्यावरून लोक ये-जा करीत होते. 

शहरात २३९ धोकादायक इमारती

  • - महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार, शहरात २३९ धोकादायक इमारती आहेत. यातील काही इमारतींचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पण त्याचा अहवाल मनपा दप्तरी आलेला नाही. नवीपेठेतील घटनेनंतर या यादीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये धोकादायक इमारतींवर नगरपालिकेने दक्षतेसाठी फलक लावले आहेत. पण महापालिकेने नवीपेठेत अशी दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. 

फौजदारीचा इशारा नवीपेठेतील रविवारी रात्री कोसळलेली इमारत सुरेश गुर्बानी यांच्या मालकीची आहे. या जागेत उमरसाब दादुमिया काखंडीकर भाडेकरू आहेत. मालक आणि भाडेकरूमध्ये वाद सुरू असल्याचे मनपा अधिकाºयांचे म्हणणे आहे. या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असून, तो मजबूत करावा किंवा हटविण्यात यावा, अशा आशयाचे पत्र महापालिकेने २००४ ला दिले होते. यानंतर २०१५ मध्ये दोन वेळा, २०१६ आणि २०१७ मध्ये पुन्हा नोटीस बजावण्यात आली. परंतु, धोकादायक भाग तसाच राहिला. सहायक अभियंता रामचंद्र पेंटर म्हणाले, महापालिकेकडून आता मालक आणि भाडेकरूला नोटीस बजावणार आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका