डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, डाॅ. रमेश फाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष दत्तात्रय बागल, कार्याध्यक्ष गणपत मोरे, उपाध्यक्ष अनिल बागल, सचिव गणेश बागल, शांतिनाथ बागल, विकास बागल, संदीप कळसुले, संजय कदम आदी उपस्थित होते. या सर्वांना डाॅ. बालाजी शिंदे, डाॅ. अमित गंगथडे, डाॅ. आण्णासाहेब बागल, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनीषा तांबोळी, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कोविड समितीचे सदस्य सरपंच ज्योती बाबर, स्वागत फाटे, अजिनाथ बागल, बालाजी बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे, ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी समीर तांबोळी यांचे योगदान लाभले.
फोटो ओळी :::::::::::::
गादेगाव कोविड सेंटरमधून बरे झालेल्या रुग्णांना प्रमाणपत्र देताना तानाजी बागल. समवेत समाजसेवक दत्ता बागल, गणेश बागल, रमेश फाटे, गणपत मोरे आदी.