शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम विकास सोसायट्यांच्या सभासदांसाठी थेट कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:53 IST

नाबार्डकडे प्रस्ताव सादर; सोलापूर पहिला लाभार्थी जिल्हा ठरणार

ठळक मुद्देसध्या राज्य बँक ९.५० (साडेनऊ) टक्क्याने जिल्हा बँकांना पैसे देतेव्याजदर कमी करण्याची मागणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलीव्याजदर कमी करुन प्रथम जिल्ह्यासाठी व नंतर राज्यातील जिल्हा बँकांना ही योजना राबविली जाणार

अरुण बारसकर 

सोलापूर : आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांच्या अखत्यारीत सक्षम विकास सोसायट्यांच्या शेतकरी सभासदांसाठी राज्य मध्यवर्ती (शिखर) बँक स्वनिधीतून थेट कर्ज देणार आहे. तसा प्रस्ताव नाबार्डकडे मंजुरीसाठी सादर झाला आहे. या नव्या प्रायोगिक तत्त्वावरील योजनेचा सोलापूर जिल्हा पहिला लाभार्थी ठरणार आहे.

शेतीवर येणाºया संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडतो आहे.  पर्यायाने बँकांची थकबाकी वाढते. वसुलीच होत नसल्याने राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीतून बाहेर येत नसल्याचे चित्र आहे. या बँका शेतकरी सभासदांना पर्यायाने शेतकºयांना एक रुपयाही कर्ज देऊ शकत नाहीत. राज्य सरकारने दोनवेळा कर्जमाफी देऊनही जिल्हा बँका तोट्यातून बाहेर आल्या नाहीत. याच बँकांच्या काही विकास सोसायट्या मोठ्या प्रमाणावर थकबाकीत असताना मात्र काही सोसायट्या संपूर्ण वसुली करुन जिल्हा बँकांची परतफेड करीत आहेत. अशा सक्षम विकास सोसायट्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांकडे पैसे नाहीत. 

नाबार्डही जिल्हा बँक गृहीत धरुन कर्जपुरवठा करते त्यामुळे सक्षम विकास सोसायट्यांचे सभासदही कर्जापासून वंचित राहतात. असा प्रकार राज्यभरात असल्याने थेट विकास सोसायट्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव आ. सुभाष देशमुख यांनी ठेवला होता; मात्र त्याला नाबार्डने मंजुरी नाकारली होती. आता नाबार्डऐवजी राज्य बँक स्वनिधीतून या सक्षम विकास सोसायट्यांसाठी कर्ज देण्यास तयार आहे; मात्र त्यास नाबार्डची परवानगी आवश्यक आहे. 

व्याजदर एक टक्का कमी असणारसध्या राज्य बँक ९.५० (साडेनऊ) टक्क्याने जिल्हा बँकांना पैसे देते. व्याजदर कमी करण्याची मागणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली आहे. अशीच मागणी राज्यातील अन्य राज्य बँकांकडून आली आहे. याचा विचार केला असून सध्यातरी एक टक्का (८.५०) व्याज आकारले जाईल असे राज्य बँकेने प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

१०० टक्के परतफेड करणारे शेतकरी व विकास सोसायट्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य बँक स्वनिधीतून नवीन योजना सुरू करीत आहे. व्याजदर कमी करुन प्रथम जिल्ह्यासाठी व नंतर राज्यातील जिल्हा बँकांना ही योजना राबविली जाणार आहे. थ्रीटायर सिस्टीमने कर्ज देण्याची नाबार्डची भूमिका असल्याने ही नवी योजना राज्य बँक सुरू करतेय.- विद्याधर अनास्करप्रशासक, राज्य बँक(शिखर) 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकagricultureशेतीFarmerशेतकरी