शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री ढाब्यावर जेवण अन् सकाळी सापडले प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:16 IST

जलसंपदा खात्यामधील क्लार्क चा शिंगोली गावाच्या शिवारात खून

ठळक मुद्देसोलापूर-मंगळवेढा रोडवरील तरटगाव शिवारामध्ये कुरुलच्या अण्णासाहेब सुरेश घोडके (वय ३५) यांचे प्रेत सापडल्याने या परिसरात एकच खळबळघटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहोचले

कुरुल: अज्ञात इसमाने काम आहे म्हणून पतीला बोलावून नेले अन् सकाळी त्याचे प्रेत सापडल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने मंगळवारी कामती पोलीस ठाण्यात दिली आहे. सोलापूर-मंगळवेढा रोडवरील तरटगाव शिवारामध्ये कुरुलच्या अण्णासाहेब सुरेश घोडके (वय ३५) यांचे प्रेत सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत अण्णासाहेब घोडके यांची पत्नी अनिता हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती जलसंपदा खात्यामध्ये क्लार्क  म्हणून कामास आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची पुणे येथे बदली झाली होती मात्र ते कामावर जात नव्हते. सोमवारी (१ जून) संध्याकाळी एका अज्ञात इसमाने काम आहे म्हणून त्यांना बाहेर घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंतही परत आले नाहीत. मंगळवारी सकाळी सोलापूर-मंगळवेढा शिवारात माने यांच्या शेतामध्ये मयत अवस्थेमध्ये आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता अज्ञात कारणावरून अण्णासाहेब घोडके यांच्या डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत रस्त्यावर टाकून दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सपोनि उंदरे करीत आहेत.

रात्री मावसभावासोबत पार्टी- घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री ९ वाजता अण्णासाहेब यांचा चुलतभाऊ रितेश याला फोन आला होता. यावेळी त्याने ‘मावस भावासोबत कामती (खु.) च्या नवीन समाधान धाबा येथे पार्टी चालू आहे. तू जेवायला ये’ असे सांगितले होते. त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती चुलतभाऊ रितेश याच्या सांगण्यावरुन हाती आली आहे. मयत घोडके यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस