शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 00:30 IST

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता.

सोलापूर/मुंबई - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आपल्या माणदेशी बोलीतील संवादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांचं त्यांच्या सांगोला या मूळगावी आज जल्लोषात स्वागत झालं. तब्बल 15 दिवसांनी आमदार पाटील त्यांच्या सांगोला मतदारसंघात परतले आहेत. त्यावेळी मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हलगीच्या तालावर, फटक्यांची आतिषबाजी झाली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 वर्षे टिकणार असे भाकीत केले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील याही पतीच्या स्वागताला हजर होत्या. यावेळी, त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. म्हणत डाललॉगबाजी केली.

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. आता, तब्बल 15 दिवसांनी त्यांनी मतदारसंघात पाय ठेवले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखा यांनी औक्षण करुन त्यांचं स्वागत केलं. तर, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... समदं ओक्के, शिंदेसाहेब मुख्यमंत्री ओक्के... असा डायलॉगही मारला. तर, पत्रकारांच्या आग्रहास्तव उखाणाही घेतला. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे, आता सगळं ओक्के वाटतंय. आता मलाही घेऊन ते गुवाहाटीला जाणारंय की, असेही रेखा यांनी म्हटले. तसेच, आशील तिथं मुलीने नम्रतेने वागावे, शहाजी बापूंसारखा पती मिळाल्यावर देवाकडे आणखी काय मागावे... असा उखाणाही घेतला. तर, अगोदरची परिस्थिती हालाखीचीच होती, अशी आठणही सांगितली. दरम्यान, आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्ते सांगोल्यात नाचताना दिसून आले. 

हे सरकार 15 वर्षे राहणार

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. गुवाहाटीला एकनाथ शिंदेंचा मावळा म्हणून मी कालची लढाई करत होतो. पण, आमच्या या लढाईत मी एक सेकंदही विचलित झालो नाही. एकनाथ शिंदेंना पांडुरंग मुख्यमंत्री करणार हे मला माझा देव सांगत होता. शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच चांगलं काम करेल, असा मला विश्वास आहे. शरद पवारांचा काय आपल्याला नवा अनुभव आहे व्हय, 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आपल्याला. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल, पण पुढील 15 वर्षे हेच सरकार राहणार, असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.

संजय राऊतांची केली नक्कल

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय. त्याचं मनगट हलतंय आणि सारखं वर करतंय ह्यों, ह्मं त्यों गेलाय... कापून काढू, प्रेतं आणू... आरं लका कुणाची प्रेतं, कुणाला कापतो, तुझं तुला चालया येईना, असे म्हणत शहाजी पाटील यांनी संजय राऊतांची थेट जाहीर सभेत नक्कल केली. तसेच, सकाळी बशीभर पवं खातंय अन् घरातनं बाहेर पडतंय. झोपताना एक चपाती खाऊन झोपतंय. लका, ये आमच्याकडे कसं बोकाड परपायचं असतंय अन् कोंबडी कशी तोडायची असती मग मनगटात रग येते. ज्याच्या मनगटात रग येते, त्यानेच बोलायचं असतंय, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली.  

टॅग्स :sangole-acसांगोलाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईMLAआमदारguwahati-pcगौहती