शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:45 IST

निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवर येताच ‘टीस’ समिती नव्याने

सोलापूर : निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवरयेताच ‘टीस’ समिती नव्यानेनेमून सर्वेक्षण करायला लावून जखमेवर मीठ चोळले़ महाराष्ट्राच्या इतिहासात धनगर समाजाइतकी कोणत्याच समाजाची फसवणूक झाली नाही़या सरकारने समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे़ या विरोधात २२ मे रोजी मंत्रालयावर राज्यभरातील समाजबांधवांना घेऊन ऐतिहासिक ढोल गर्जना मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़शेंडगे म्हणाले, १९५६ साली नेमलेल्या समितीने सर्वेक्षण करुन धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबसाठी असलेल्या( एस़टी़ ) आरक्षणानुसार सवलती देण्याची शिफारस केंद्राकडे केली होती़ त्यानंतर राज्य सरकारने या समाजाचा शेड्यूल ट्राईबमध्ये समावेशही केला़मात्र ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ हा उल्लेख केला गेला आणि ४ पिढ्या उद्ध्वस्त झाल्या़ ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहे, याबाबतचे असंख्य पुरावे विधानसभेत दिले गेले तरी याची फारशी कुणी दखल घेतली नाही़ २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर-बारामती पदयात्रा काढून आंदोलन केले तसेच ९ दिवस उपोषण करुनही लक्ष वेधले़ हे उपोषण सोडवायला आलेले तत्कालीन भाजपा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आलो की पहिल्याच कॅबिनेट बैठकीत विषय घेऊन अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत ग्वाही दिली़आतापर्यंत जवळपास २२५ कॅबिनेट बैठका झाल्या़ पण एकदाही हा विषय त्यांनी हाती घेतला नाही़ हे सरकार झोपेचे सोंग घेतले असले तरी ढोल वाजवून त्याला जागे करणार आहोत़रेकॉर्ड मोडणार...आता निवडणुका एक वर्षाच्या टप्प्यावर आल्या आहेत़ आंदोलनाशिवाय पर्याय नाही़ २२ मे रोजी राज्यभरातून ११ हजार ढोल घेऊन आझाद मैदानावरुन वाजवत मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे़ यापूर्वीच्या आंदोलनात १,३५६ ढोल वाजवून रेकॉर्ड बे्रक केला होता़ हे रेकॉर्ड मोडून विश्वविक्रम करणार असल्याचेही माजी आमदार शेंडगे यांनी सांगितले़