अध्यक्षस्थानी माजी केंद्र प्रमुख विश्वास जगदाळे होते. व्यासपीठावर नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, नंदकुमार काशीद, झेडपी सदस्या रेखा राऊत, श्रीमंत थोरात, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, मनीष चव्हाण, डॉ. अरुण नारकर, माजी सभापती युवराज काटे, गणेश जगताप, अशोक काशीद, वैभव जाधव, डॉ. वैभव राऊत, नेताजी गायकवाड,बंडू माने, भास्कर काशीद, बार्शी बाजार समितीचे संचालक मुन्ना डमरे, ॲड. सुभाष जाधवर, अरुण सावंत, माजी सरपंच नानासाहेब गायकवाड, डॉ. अतुल भालके, नूतन ग्रामपंचायत सदस्य, वालवड, चारे, पिंपळवाडी, पाथरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सोपल यांनी, कोरोना पूर्ण गेलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. नंदकुमार काशीद, नागेश अक्कलकोटे, रेखा राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य संपत काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुंदरराव जगदाळे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे लगेचच प्रत्येक प्रभागातील कामाचा प्राधान्य क्रम ठरवून आराखडा तयार केला जात आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विरोधकांना विश्वासात घेऊन विकासाचा विठ्ठल उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोपल साहेबांनी भविष्यात २५ गावांची जरी जबाबदारी दिली तरी मी समर्थपणे पार पाडेन, असेही जगदाळे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती वाघमारे यांनी केले.
----०२बार्शी-चारे...