पाणी असूनही करमाळ्यात पूर्वभागामध्ये पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:35+5:302021-04-11T04:21:35+5:30

करमाळा : तालुक्याच्या पूर्व भागात वीज पुरवठा अपुरा असल्याने पाणी असूनही बरीच पिके करपली आहेत. त्यामुळे पूर्व भागात धरण ...

Despite the water, crops were planted in the eastern part of Karmala | पाणी असूनही करमाळ्यात पूर्वभागामध्ये पिके करपली

पाणी असूनही करमाळ्यात पूर्वभागामध्ये पिके करपली

Next

करमाळा : तालुक्याच्या पूर्व भागात वीज पुरवठा अपुरा असल्याने पाणी असूनही बरीच पिके करपली आहेत. त्यामुळे पूर्व भागात धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.

सीना कोळेगाव धरण तीन वर्षानंतर यंदा प्रथमच शंभर टक्के भरले आहे. परिणामत: पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. आवाटी, गौंडरे, निमगाव, कोळगाव, हिवरे, मिरगव्हाण, अर्जुननगर, सालसे, नेरले या सीना नदीवर अवलंबून असणारे शेतकरी मागील काही वर्षात दुष्काळी स्थितीने हैराण झाले आहेत.

यावर्षी धरण भरल्यामुळे रात्रंदिवस मेहनत करून उसाची लागवड केली. त्यातच ऐन उन्हाळ्यात वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला. अनेकांची वीज तोडली. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असतानाही काही शेतकऱ्यांनी दिवसभर रांगेत थांबून वीज बिल भरले. आता वीज सुरळीत मिळेल ही आशा होती. परंतु पुन्हा पदरी निराशाच आली.

---

महाराष्ट्राला शेतीसाठी ८ ते १० तास वीज मिळत असताना अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या भागात शेतकऱ्यांना फक्त चार तास वीज मिळत आहे. त्यातही कमी पुरवठा, अधूनमधून होणाऱ्या बिघाडामुळे वीजपंप तीन तास चालतात. धरणात आज ८० टक्के पाणीसाठा असताना वीज वितरणच्या नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.

- सागर देशमुख

सर्वसामान्य, सालसे, करमाळा

---

सध्या शेतकरी अनेक संकटात सापडला आहे. त्यांच्यापुढील समस्या पाहाता वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी थकबाकीबाबत चर्चा केली आहे. सवलतीत, हप्ते करून वीज बिले भरण्याबाबत अधिकारी सकारात्मक आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच पिके जळू नेत म्हणून वीज पुरवठा अखंडित पणे करण्याबाबतही सूचना त्यांना दिल्या आहेत.

- संजय शिंदे

आमदार, करमाळा

---

१० करमाळा

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने करमाळा भागात पूर्वभागात उसाचे पीक पाण्याअभावी करपले आहे.

Web Title: Despite the water, crops were planted in the eastern part of Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.