शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्र्यांना तीनवेळा पत्रे देऊनही सोलापूर महापालिकेची झोन निर्मिती अकरा महिने बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:57 IST

सोलापूर : महापालिका विभागीय कार्यालय निर्मितीसंदर्भात सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यासाठी प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून राज्याच्या ...

ठळक मुद्देमहापालिका विभागीय कार्यालय निर्मितीसंदर्भात सर्वसाधारण सभेने केलेला ठरावगेल्या ११ महिन्यांपासून राज्याच्या नगरविकास खात्यात पडून महापालिकेच्या प्रभाग समित्या स्थापण्याचा विषय प्रलंबित राहिला

सोलापूर : महापालिका विभागीय कार्यालय निर्मितीसंदर्भात सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यासाठी प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून राज्याच्या नगरविकास खात्यात पडून आहे. यामुळे महापालिकेच्या प्रभाग समित्या स्थापण्याचा विषय प्रलंबित राहिला असून, त्याचा नगरसेवकांच्या कामांवरही मोठा परिणाम होत आहे. 

महापालिकेची सध्या आठ विभागीय कार्यालये आहेत. शहराचा विस्तार होतोय. या पार्श्वभूमीवर विकासकामांचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने आठऐवजी नऊ झोन कार्यालयांची निर्मिती व्हावी, असा सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या ९ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आठऐवजी नऊ विभागीय कार्यालयांची निर्मिती व्हावी, असा ठराव संमत करण्यात आला.

परंतु, सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. नवे झोन तयार केल्यानंतर आस्थापनेसह इतर प्रकारचा खर्च महापालिकेला परवडणार नाही. शहराच्या सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आठऐवजी नउ प्रभाग गठीत करणे कायद्याला धरुन नाही. या कारणास्तव प्रशासनाने या ठरावावर आक्षेप घेऊन तो विखंडित करण्यासाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविला. गेल्या ११ महिन्यांपासून हा प्रस्ताव नगरविकास खात्यात पडून आहे. त्यामुळे प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत. 

पाठपुरावा होतोय, पण निर्णय नाही - शहर व हद्दवाढ भागातील विविध विकासकामांना प्रभाग समित्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येते. सध्या या समित्याच अस्तित्वात नसल्याने याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे पत्र महापौर शोभा बनशेट्टी आणि सभागृह नेते संजय कोळी यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा दिले आहे. महापालिका आयुक्त सोमवारी मुंबईत होते. त्यांनीही यासंदर्भात नगरविकास खात्यातील अधिकाºयांची चर्चा केली.

दोन गटातील वादाचा परिणाम- शिवसेना नगरसेवक राजकुमार हंचाटे म्हणाले, खरं तर झोन निर्मितीचा विषय दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. भाजपच्या दोन गटामध्ये वाद आहेत. या वादामुळे या विषयावर निर्णय होत नाही. प्रभागामध्ये काम करताना नगरसेवकांना बºयाच अडचणी येत आहेत. वास्तविक दोन्ही मंत्र्यांनी यात लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला हवा. 

राज्याप्रमाणे महापालिकेतही भाजपाची सत्ता द्या, आम्ही शहराचा विकास करुन दाखवू, असे भाजपावाले निवडणुकांमध्ये सांगत होते. आता सत्ता दिल्यानंतर शहराची वाट लागल्याचे आम्ही पाहत आहोत. साध्या झोन निर्मितीच्या प्रस्तावावर शासनाला निर्णय घ्यायला ११ महिने लागत आहेत. भांडवली निधीचा निर्णय झालेला नाही. एका प्रभागाचा संबंध किमान तीन झोन कार्यालयांशी येतो. पाणी, कचरा, वीज अशा प्रश्नावर आम्हाला अधिकाºयांना शोधत बसावे लागेल. नवे नगरसेवक तर हैराण झाले आहेत. झोन समित्या तयार झाल्या तर सर्वांचीच अडचण दूर होईल. त्यामुळे यावर लवकरच निर्णय झाला पाहिजे. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका, काँग्रेस. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस