शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाची विटंबना होता कामा नये; बिलासाठी प्रेत अडविल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:36 IST

पालकमंत्री दत्तात्रय भरणे; ‘लोकमत’ च्या वृत्ताची घेतली दखल

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची महापालिकेकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी व विभागीय आयुक्तांकडे असलेल्या माहितीत फरक महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी खासगी रुग्णालयाकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अशी गडबड होत असल्याचे स्पष्ट केलेजिल्ह्यात १८९७  कोरोना रुग्ण आढळले व यातील ९७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७२ रुग्णांवर उपचार सुरू

सोलापूर: मृतदेहाची विटंबना होता कामा नये. महापालिकेच्या आधिकाºयांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे़ खासगी रुग्णालयांनी बिलासाठी मृतदेहाची अडवणूक केल्यास कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाºयांना दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

‘एकीकडे अंत्यसंस्कार होत असताना दुसरीकडे घरात ‘तिसरा’चा विधी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या हॅलो सोलापूर पुरवणीत १८ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची सूचना केली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूर दौºयावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहरात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, याबाबत समाधान व्यक्त केले. सर्व अधिकारी चांगले काम करीत आहेत व नागरिक फिजिीकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत असल्याने फरक जाणवत आहे. शहरातील बरेच भाग कोरोनामुक्त होत आहेत. पण याबाबत बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व गोष्टींचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

शहरात अद्यापही काही रुग्णालये बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देत नाहीत, याकडे लक्ष वेधल्यावर पालकमंत्री भरणे यांनी ही बाब अत्यंत गंभीर आहे. मृतदेहाची विटंबना होता कामा नये. मनपाच्या अधिकाºयांनी यात लक्ष घालून काय अडचणी आहेत, हे तपासून प्रश्न निकाली काढला पाहिजे. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालावे, अशी सूचना केली.

खासगी रुग्णालयांकडून होतोय विलंबकोरोना रुग्णांची महापालिकेकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी व विभागीय आयुक्तांकडे असलेल्या माहितीत फरक असल्याचे निदर्शनाला आणल्यावर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी खासगी रुग्णालयाकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अशी गडबड होत असल्याचे स्पष्ट केले.  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी माहिती देताना जिल्ह्यात १८९७  कोरोना रुग्ण आढळले व यातील ९७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू