शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:37+5:302021-06-23T04:15:37+5:30

बार्शी : कोरोनामुळे अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची फी ५० टक्के कमी करण्याची मागणी ...

Demand for 50% reduction in education fees | शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के कमी करण्याची मागणी

शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के कमी करण्याची मागणी

Next

बार्शी : कोरोनामुळे अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची फी ५० टक्के कमी करण्याची मागणी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली.

कोरोनामुळे यंदा आर्थिक उत्पन्नाला खीळ बसली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी मुलांचे प्रवेश करून घेतले. त्यानंतरसुद्धा शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू राहिले.

अशा परिस्थितीत शैक्षणिक फी ५० टक्के कमी करावी. २०२१-२२ सालची फी पन्नास टक्के कमी करून टप्प्याटप्प्याने घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन नायब तहसीलदार काझी यांना देण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष दीपक आंधळकर, डॉक्टर राहुल ताटे, बापू तेलंग, अन्वर मुजावर, डीजे, उमेश जाधव, जावेद पठाण उपस्थित होते.

----

फोटो : २१ बार्शी

शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार काझी यांना देताना दीपक आंधळकर, डॉक्टर राहुल ताटे, बापू तेलंग, अन्वर मुजावर, डीजे, उमेश जाधव, जावेद पठाण.

Web Title: Demand for 50% reduction in education fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.