शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या वादात सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक लटकले, मुख्य लेखापाल अन् नगरसचिव यांच्यात टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:03 IST

सोलापूर : महापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी ...

ठळक मुद्देमहापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी केलीमुख्य लेखापाल आणि नगरसचिव यांच्यातील समन्वयाअभावी हे अंदाजपत्रक गेले चार दिवस सुटकेसमध्येच पडून

सोलापूर : महापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र मुख्य लेखापाल आणि नगरसचिव यांच्यातील समन्वयाअभावी हे अंदाजपत्रक गेले चार दिवस सुटकेसमध्येच पडून आहे. 

महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी ३१ मार्चअखेर मंजूर केले जाते. मनपा प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक प्रथम स्थायी समितीमध्ये पाठविले जाते. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ते चर्चेसाठी सभागृहात येते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती सभापतीपदावरुन वाद झाला. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सभागृहाकडे पाठवावे लागले. त्याला जून महिना उजाडला. मार्च महिन्यात मंजूर होणारे अंदाजपत्रक जून महिन्यात मंजूर झाल्याने सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांवर टीका झाली होती.

यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अंदाजपत्रक मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी आणि सभागृह नेते संजय कोळी सांगत आहेत. दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत महापालिका प्रशासन अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करते. यंदाही मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी अंदाजपत्रक तयार केले. यादरम्यान, महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाली. प्रभारी आयुक्तांच्या सहीने १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला पाठविण्यासाठी नगरसचिव कार्यालयात सादर केले.

नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या अंदाजपत्रकाची प्रत स्वीकारली. त्यानंतर त्यांनी स्थायी समिती अस्तिवात नसल्याचे पत्र मुख्य लेखापाल कार्यालयाला पाठविले आहे. या पत्रानंतर मुख्य लेखापाल यांनी हे अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करणे अपेक्षित असल्याचे नगरसचिव कार्यालयाचे म्हणणे आहे. पण जोपर्यंत नगरसचिव अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करा, असे लेखी पत्र देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ते सर्वसाधारण सभेकडे कसे द्यायचे, असा सवाल लेखापाल धनवे यांनी उपस्थित केला आहे. या वादात गेलेले अंदाजपत्रक सुटकेसमध्ये पडून आहे. 

अधिकाºयांनी चर्चा करायला हवी होती..- एक मार्चला महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे. त्यात अंदाजपत्रक मंजूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंदाजपत्रक लवकर सादर करा, असे पत्र नगरसचिव आणि मुख्य लेखापाल यांना दिले आहे. अधिकाºयांना काही अडचण आली तर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. दोघेही महापालिकेचे प्रमुख अधिकारी आहेत. अशा प्रकारची टोलवाटोलवी त्यांनी करायला नको आहे. उद्या दोघांनाही बोलावून अंदाजपत्रकाचा विषय मार्गी लावू, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी यावेळी सांगितले.

मुख्य लेखापाल यांनी स्थायी समितीसाठी अंदाजपत्रक पाठविले आहे. पण सध्या स्थायी समिती सभापतीपदाचा वाद सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत मुख्य लेखापाल यांना अवगत केले आहे. - प्रवीण दंतकाळे, नगरसचिव, महापालिका. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे सादर करा, असे नगरसचिवांनी सांगायला हवे. तसे थेट पत्र द्यायला हवे. तरच हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत येईल. - शिरीष धनवे, मुख्य लेखापाल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प