शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मोहोळ मतदारसंघातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:12 IST

सरपंच आले एकत्र;  खराब रस्त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेल्याची भावना

ठळक मुद्देऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीपंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, विटे व पोहोरगाव या चार गावांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला

सुस्ते : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकºयांचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिºहेमार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे १५ किमी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. या रस्त्याच्या प्रश्नावरून मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, विटे व पोहोरगाव या चार गावांनी विधानसभामतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. 

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थी  माध्यमिक व महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जावे लागते; मात्र हा रस्ता खराब असल्याने वेळेत एसटी येत नाही. घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अचानक एखाद्या रुग्णास पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते; मात्र  रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होत नाहीत. अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच जीव गमवावा लागतो.

गेल्या वीस वर्षांपासून या चार गावच्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता नूतनीकरणासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीने ठराव देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच यापूर्वी अनेक नेतेमंडळींकडे रस्त्याची मागणी केली असता, नेत्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्याने या रस्त्याचे नूतनीकरण झाले नाही. रस्त्यावरून जात असताना अनेकांना कमरेचे, मणक्याचे आजार झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. या गावच्या सरपंचांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी गावचे सरपंच संगीता कांबळे, विट्याचे  सरपंच सिंधुबाई दांडगे, पोहोरगावचे सरपंच लता काळे, तारापूरचे सरपंच समाधान शिंदे , मोहन दांडगे, सौदागर गायकवाड, रेवणसिद्ध पुजारी, विठ्ठल पाटील, बालाजी वाघ, दिगंबर कांबळे, छगन पवार, राजूबापू पाटील, प्रताप पवार, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सपाटे, वैभव डोळे, लाखात मुलाणी,  अल्ताफ मुलाणी,  सिद्धेश्वर गायकवाड, संजय परकाळे, दिलीप पवार, शरद पवार, आनंदा पवार, अमर पवार, बंडू पवार, सागर पवार, दादा सलगर, हनुमंत पाटील, श्रीकांत डोळे, सिद्धाराम वाघमोडे, गणेश शिंदे, लक्ष्मण डोंगरे, अरुण परे, बाबासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

चार गावात ७९०० मतदार- तारापूर २ हजार ५००, खरसोळी १ हजार ९००, विटे १ हजार १०० व पोहोरगाव २ हजार ४०० असे एकूण चार गावचे मतदान ७ हजार ९०० इतके मतदान आहे. 

आम्ही गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. तरी शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. तसेच गेल्या आठवड्यात या रस्त्यावरून विद्यार्थी घेऊन जाणारी शाळेची बस घसरली होती. त्या अनुषंगाने आम्ही या चार गावचे लोक एकत्र येऊन रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.         - दिगंबर कांबळे, खरसोळी

नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तो रस्ता व्हावा यासाठी  मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. - समाधान शिंदे, सरपंच, तारापूर

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmohol-acमोहोळpandharpur-acपंढरपूरroad safetyरस्ते सुरक्षाVotingमतदान