शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

होटगी मठाचे योगीराजेंद्र शिवाचार्य यांचे निधन, होटगी मठाच्या शाळा, महाविद्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:42 PM

महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे तपोरत्नं, श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते ९० वर्षांचे होते.

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणारशुक्रवारी जगद्गुरूंच्या सान्निध्यात अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठाच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होटगी मठाच्या शाळा, महाविद्यालये बंद

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे तपोरत्नं, श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते ९० वर्षांचे होते.होटगी मठाचे पूज्य चन्नवीर शिवाचार्य लिंगैक्य झाल्यावर उत्तराधिकारी म्हणून तपोेरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा होटगी मठाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक सोहळा पार पडला होता. सोलापूर येथील बाळीवेस मठात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांच्या उपस्थितीत शिवलिंग पूजेचा सोहळा पार पडायचा. श्रावण महिन्यात होटगी मठात त्यांच्या तपोनुष्ठान सोहळ्यालाही भाविकांची मोठी उपस्थिती असायची. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि बाळीवेस येथील होटगी मठानंतर तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी बृहन्मठ उभारला. दाक्षिणात्य पद्धतीचे महाद्वार उभे करून त्यांनी एक वेगळी वास्तुरचना उभी करून सोलापूरच्या वैभवात भर घातली. याच मठात धर्मसंस्कार वृद्धीसाठी रुद्रपठण, होमहवन, पूजाविधी, सुसंस्कार वर्ग घेऊन हजारो बटूंना घडवले. धर्मसंस्कारासाठी होटगीपासून हिमाचल प्रदेश, शिखर शिंगणापूर, नवी दिल्ली येथे तपोनुष्ठान केले. श्रावणातल्या मधल्या सोमवारी पालखी महोत्सव काढण्यासाठी राज्यभर पदभ्रमंती योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी केली होती. जगद्गुरूंच्या पंचपीठामध्ये होटगी महास्वामीजींचा सन्माननीय वावर होता. देशात ठिकठिकाणी त्यांचे अनेक मठ आहेत. जिल्ह्यात शैक्षणिक संस्था सुरू करून त्यांनी तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली.दरवर्षी ५ फेब्रुवारी रोजी निघणाºया लिंगैक्य पूज्य चन्नवीर शिवाचार्य यांच्या आत्मलिंग ज्योत यात्रेत योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा बाळीवेस येथील मठापासून ते होटगी येथील मठापर्यंत पायी सहभाग असायचा. भाविक श्रीमंत असो की गरीब, याकडे न पाहता प्रत्येक भाविकाकडे पाहण्याचा, बोलण्याचा त्यांचा खास पिंड होता. अलीकडे शरीराने थकले असले तरी मनाने ते कधीच थकले नाहीत. आजपर्यंत अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठ, बाळीवेस आणि होटगी येथील मठात जाऊन भाविकांना दर्शन देण्याची त्यांची पद्धत होती. आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांनी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची नियुक्ती केली होती. योगीराजेंद्र शिवाचार्य लिंगैक्य झाल्याची वार्ता कळताच भाविकांवर, तिन्ही मठांवर आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर शोककळा पसरली. बुधवारी रात्रीपासूनच भाविकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उद्या (गुरुवारी) आणि शुक्रवारी होटगी मठाच्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. --------------------शुक्रवारी अंत्यसंस्कार- उद्या (गुरुवारी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री बाळीवेस येथील होटगी मठातही भाविकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. शुक्रवारी जगद्गुरूंच्या सान्निध्यात अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठाच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधींसह अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर