शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णी बाह्यवळणावर कारच्या धडकेत मित्राचं लग्न उरकून निघालेल्याचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 26, 2024 22:53 IST

आकाश संजय बोलवणकर असे मृत व्यक्तीचे नाव

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या मोटारसायकलला कारची जोरात धडक बसून मित्राचं लग्न उरकून निघालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. आकाश संजय बोलवणकर (वय २५, रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे, मुळ रा. बुलढाणा) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून २६ फेब्रवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान टेंभुर्णी येथे सोलापूर बाह्य वळणावर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेला त्याचा सहकारी प्रदीप आव्हाळे (वय २५ रा. टॉवर लाईन, निगडी, जि. पुणे, मुळ रा. धाराशिव) याच्यावर टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पुणे येथे एकाच कंपनीत काम करत असलेल्या सहकारी मित्राचा लग्नासाठी मयत आकाश बोलवणकर आणि त्याचा सहकारी आव्हाळे हे दोघे मोटारसायकल (एम. एच. १९ / इ. एच. २३६८) वरून २५ फेब्रुवारीला सोलापूर येथे गेले होते. लग्न उरकून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुणे येथे कामाच्या ठिकाणी परत निघाले होते. टेंभुर्णी येथे सोलापूर बाह्य वळणावर रस्ता क्रॉस करत असलेल्या कार (एम. एच. १३/ बी. एन. ४६०४) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात आकाशचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला प्रदीप आव्हाळे हा गंभीररित्या जखमी झाला. त्यास येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशीरा पर्यंत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

टॅग्स :Accidentअपघात