शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पुरामुळे १३३ गावातील १० हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:30 IST

पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

सोलापूर : वीर व उजनी धरणातून नीरा व भीमेत सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरात जिल्ह्यातील १३३ गावांमधील १० हजार ८२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अद्याप शेतांमधून पाणी वाहत असल्याने उभी पिके नष्ट होणार आहेत. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.   पहिल्या टप्प्यातील पंचनाम्यात   १0 हजार ८२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पुराची हानी पोहोचल्याचे दिसून येत आहे. यात गावनिहाय व पीकनिहाय नुकसानीचा काढलेला अंदाज पुढीलप्रमाणे आहे. 

दक्षिण सोलापूर, गावे: १५,क्षेत्र: ६४१.८0 हेक्टर. पिकनिहाय नुकसान: ऊस: ५३३ हेक्टर, केळी: २0.२0, पेरू: १.६0, चिंच: 0.४0, नारळ: 0.२0, मका: ३३.00, मूग: ३.00, उडीद: १५.00, सोयाबीन: २.00, तूर: ३0.00, भुईमूग: १.८0, बांबू: १.६0. पंढरपूर, गावे: ४४, क्षेत्र: ७२९१.00 हेक्टर, ऊस: ६२५५.00, मका:४५२.00, चारापिके: ४१४.00, केळी: १0८.00, डाळिंब: १८.00, कांदा: ४४. मंगळवेढा : गावे : १५, क्षेत्र : १७0.00 हेक्टर. ऊस: ५0.00, सूर्यफूल: १0.00, मका: ११0.00. माढा : गावे: २६, क्षेत्र: ७८0.00. सर्व ऊस, मोहोळ: गावे: ५, क्षेत्र: २७५.00 हेक्टर, सर्व ऊस. माळशिरस: गावे: २८, क्षेत्र: १६६२.४0 हेक्टर, बाजरी: ११८.00, मका: ३१९.00, कडवळ: २३0, ऊस: ६९६.00, केळी: १९९.00, डाळिंब: ६४.४0, भाजीपाला: २२.00, मका चारा: १४.00.

बाधितांची संख्या २२ हजार- पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांची संख्या २२ हजार ७१५ इतकी झाली आहे. यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढ्यातील लोकांची संख्या वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६०७ कुटुंबातील २८७१ जणांना तर मंगळवेढा तालुक्यातील १५९ कुटुंबातील ९२0 जणांना आणि अक्कलकोट तालुक्यातील धारसंग येथील एका कुटुंबातील १0 जणांना गुरुवारी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. 

बाधित लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पंढरपूर: उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, शिरढोण—कौठाळी: शैलेश सूर्यवंशी, गोपाळपूर—मुंढेवाढी : प्रांत अधिकारी ज्योती कदम, सुस्ते: तहसीलदार संजय पाटील, शेगाव दुमाला: सुशील बेल्हेकर, ६५ एकर: अनिल कारंडे यांच्यावर देण्यात आली आहे. - उजनी व वीर धरणातील गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हिळ्ळी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे, कर्नाटक राज्यातील इंडी तालुक्यातील गुब्याड गावचा संपर्क तुटला असून, हिळ्ळीत पाच किलोमीटर अंतरावरील शेतात उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. 

तडवळ परिसरात पाहणी- अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी, कुडल, आंदेवाडी, आंदेवाडी खु., कोर्सेगाव, देवीकवठा, म्हैसलगी, खानापूर, अंकलगे, आळगे, शावळ या १२ गावांना  पुराचा फटका बसलेला आहे. गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकºयांवर आता पुराचे संकट आल्याने हातचे पीक गेले आहे. पुराने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी झेडपीचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरPandharpurपंढरपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय