शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावडर निर्मितीसाठी ८० लाख लिटर दुधाचा दररोज होतोय वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:39 IST

दुग्ध व्यवसाय कार्यालयाची माहिती; खुली विक्री बंद होत असल्याचा परिणाम

ठळक मुद्दे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन ४० हजार लिटरपेक्षा कमी झाले खरेदी केलेल्या दुधाची विक्री करता येत नाही, पावडर तर किती बनविणार व पावडरीची विक्री झाली नाहीआता खासगी संघाने दूध खरेदी बंद केल्याने जिल्हा संघाचे संकलन ५० हजार लिटरवर गेले

सोलापूर: पॅकिंग व खुल्या पद्धतीने होणारी दूध विक्री जवळपास बंद झाल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध विक्री होत नसल्याने एकट्या पश्चिम महाराष्ट्रातूनच दूध पावडर निर्मितीसाठी सुमारे ८० लाख लिटर दूध दररोज पाठवावे लागत असल्याचे पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दूध संकलन होते. १५ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात दररोज एक कोटी १० लाख लिटर दूध संकलन होत होते. हे दूध मुंबई, पुणे व अन्य शहरांत घरगुती वापरासाठी, हॉटेल व उपपदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जात होते. 

मात्र कोरोनाच्या निमित्ताने दक्षता घेण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर हळूहळू संकलन कमी केले जात आहे. सध्या दररोज ९० ते ९२ लाख लिटर इतकेच दूध संकलन होत असल्याचे सांगण्यात आले. अनेक लहान- मोठ्या संस्थांनी व व्यक्तींनी संकलन कमी किंवा बंद केल्याने सध्या १५ ते २० लाख लिटर दूध घरीच वापरावे लागते.हा फटका थेट शेतकºयांना बसत आहे. 

पॅकिंग व लुज दुधाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाल्यामुळे संकलन होणाºया दुधापैकी ७० ते ८० लाख लिटर दूध पावडरीसाठी वापरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. वरचेवर दूध वितरणाच्या अडचणीत वाढ होत असल्याने संकलनातही कपात करावी लागत असल्याचे सोनाई दूध संस्थेचे दशरथ माने यांनी सांगितले. 

दुधाची व्यवस्था करण्यासाठी दिले पत्र- सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन ४० हजार लिटरपेक्षा कमी झाले होते. आता खासगी संघाने दूध खरेदी बंद केल्याने जिल्हा संघाचे संकलन ५० हजार लिटरवर गेले आहे. शिवाय वरचेवर वाढच होत आहे. यापैकी २० हजार लिटर दूध पॅकिंग करुन विक्री होते. उर्वरित दुधाचे काय करायचे?, विक्रीची व्यवस्था करा, असे पत्र जिल्हा सहकारी दूध संघाने पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकाºयांना दिले आहे.

या दुधाचे करायचे काय?: माने- खरेदी केलेल्या दुधाची विक्री करता येत नाही, पावडर तर किती बनविणार व पावडरीची विक्री झाली नाही तर दुधाचे पैसे शेतकºयांना कोठून द्यायचे?, असा प्रश्न सोनाई दूध संस्थेचे दशरथ माने उपस्थित केला आहे. खरेदी दुधाला किती दर द्यायचा हा तर प्रश्न वेगळाच असल्याचे माने यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा