शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात संचारबंदी; मोकाट फिरणाºयांवर पोलिसांनी ठेवली ड्रोनद्वारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:14 IST

संचारबंदीचा तिसरा दिवस; पोलिसांची कडक नाकेबंदी, शहरात शुकशुकाट

ठळक मुद्देपंढरपूर शहरालगत असणारा लक्ष्मी टाकळी परिसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला काहीजण पोलिसांची नजर चुकवून शहरातील गल्लीबोळातून फिरताना दिसून आलेपंढरपूर शहरात सध्या पोलीस, आरोग्य, सफाई, महसूल कर्मचारी, हॉस्पिटल व मेडिकल व्यतिरिक्त कोणीही दिसत नसल्याने शहरात शुकशुकाट

पंढरपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर शहरात सात दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. आज तिसºया दिवशी पोलिसांनी नाकेबंदी अधिक कडक केली आहे. त्यामुळे मंदिर परिसर, प्रमुख मार्ग, चौक व शहरातील नेहमी गजबजलेल्या भागात शुकशुकाट जाणवला. याकाळात काही निमित्ताने बाहेर पडणारे, गल्लीबोळात मोकाट फिरणाºयांवर पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवली.

संचारबंदीच्या तिसºया दिवशी प्रशासनाने ‘चेस द व्हायरस’ या मोहिमेला गती देत रॅपिड अँटिजेन टेस्ट राबविली. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. टाकळी परिसरातील नागरिकांनी ‘पूर्व कल्पना का दिली जात नाही ?’असा प्रश्न करीत आरोग्य यंत्रणेविरोधात नाराजी व्यक्त केली़ सोलापूर नंतर जिल्ह्यात पंढरपुरात कोरोनाचा विळखा सर्वाधिक घट्ट होत आहे. आत्तापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पंढरपूर शहर व तालुक्यात झाली आहे़ त्यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर प्रशासनही सतर्क  झाले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूरमध्ये सात दिवसांची संचारबंदी अवलंबली आहे.

विनाकारण फिरणाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. काहीजण पोलिसांची नजर चुकवून शहरातील गल्लीबोळातून फिरताना दिसून आले़ अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर सुरू केला आहे़ पंढरपूर शहरात सध्या पोलीस, आरोग्य, सफाई, महसूल कर्मचारी, हॉस्पिटल व मेडिकल व्यतिरिक्त कोणीही दिसत नसल्याने शहरात शुकशुकाट आहे.प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व आजूबाजूच्या गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम जोरदारपणे राबविली गेली़ मागील दोन दिवसांमध्ये दोन हजारावर रॅपिड टेस्ट करून २०० पेक्षा जास्त रुग्ण शोधून काढण्यात आले. 

लक्ष्मीटाकळी कोरोनाचा नवा हॉटस्पॉट...पंढरपूर शहरालगत असणारा लक्ष्मी टाकळी परिसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. म्हणून त्या परिसरातही रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविली़ कोणी वंचित राहू नये म्हणून ही टेस्ट करायच्या आदल्या दिवशी कल्पना दिल्यास अधिकाधिक लोक चाचण्या करून घेतील असा सूर काही ज्येष्ठांमधून उमटला़

चौकाचौकात जाणवला शुकशुकाट संचारबंदीचा शनिवारी तिसरा दिवस होता़ पहिल्या दोन दिवसांचा अनुभव पाहता शनिवारी पोलिसांनी नाकाबंदी आणखी कडक केली़ शहरात आंबेडकर चौक, शिवाजी चौक, सरगम चौक, कराड नाका, सांगोला नाका, नवीन सोलापूर रोड, जुना सोलापूर रोड परिसरात पोलिसांनी लोखंड बॅरिकेड्स लावून रस्ते सील केले. येणाºया जाणाºयांची चौकशी, लायसन्स, त्याचे कारण, आवश्यक कागदपत्रे याची तपासणी करून सोडले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या