शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मनिष काळजे याच्यावर खंडणी अन्‌ धमकीचा गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: July 3, 2024 12:42 IST

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याची फिर्याद ठेकेदार आकाश उत्तम कानडे (वय २३, रा. मानेगाव, ता. बार्शी यांनी दिली आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०८ (३), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये मंगळवारी रात्री ११ वाजता गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ठेकेदार आहेत. सोमवारी (१ जुलै) सकाळी ११ च्या सुमारास इंजिनिअर दीपक रामचंद्र कुंभार यांनी मनिष काळज़े याच्या सात रस्ता येथील कार्यालयात घेऊन गेले. तेथे नमूद लोकांनी फिर्यादीला एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रुपयांचे आहे. त्याच्या १५ टक्केप्रमाणे ११ लाख रुपयांची मागणी केली. यावर फिर्यादीने नकार दिल्याने त्यास दमदाटी व शिवीगाळ करुन ‘तुला काम कसे मिळते ते पाहतो. तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार’ अशी दमदाटी केली.

मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासमवेत त्यांच्या विभागाचे सहा. अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे एमआयडीसीतील कामाची वर्क ऑर्डर मंजूर झाली काय? अशी विचारणा करण्यासाठी गेले. तेथे काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा तेथे होता. त्याने फिर्यादी महापालिकेत आल्याची खबर दिली. त्यावरुन काळजे आणि चालकाने तेथे येऊन फिर्यादीसह अभियंत्याशी चर्चा सुरु केली मात्र फिर्यादी ऐकत नाही असे पाहून त्याने फिर्यादीच्या तोंडावर चापटा मारल्या. सहा. कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा सारा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी फौजदार बनकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

सोलापुरात राहून न देण्याची धमकीमहापालिकेत अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार घडताना सोडवासोडवी करुन बाजूला केले. दरम्यान, निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉलप्रमाणे मला दे’ असे म्हणत ‘तुला अख्या सोलापुरात राहू देणार नाही’ अशी धमकी देऊन मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

डीसीबी पोलीस ठाण्यातसदरचा प्रकार हा दुपारी घडलेला असताना गुन्हा नोंदवण्यास उशीर होत असल्याच्या प्रकारामुळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे तातडीने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्याशी चर्चा होऊन गुन्हा नोंदवण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी