शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणा-या चौघांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Updated: May 9, 2024 20:59 IST

बागलवाडीतील घटना : मुख्य आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर : बागलवाडी (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्र. ८६ वरील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटविल्याच्या घटनेचे मतदान केंद्राबाहेर खिडकीतून चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण (सर्वजण रा. बागलवाडी) आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वीच गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादासाहेब मनोहर चळेकर (रा. बागलवाडी) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० मेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार, ७ मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडीतील दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने बूथ क्रमांक ८६ वर येऊन दुपारी १२:४८ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावताना खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवून दिले. या घटनेत ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासलेसोशल मीडियावर प्रसारित झालेले चित्रीकरण व मतदान केंद्रातील परिस्थितीचे अवलोकन करून मतदान केंद्रामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता मतदान केंद्रामध्ये दादासाहेब चळेकर यांनी येऊन मतदान केल्यानंतर टेबलवर ठेवलेल्या तीन ईव्हीएम पेटविल्याचे अनोळखी व्यक्तीने मतदान केंद्राच्या खिडकीच्या बाहेर उभे राहून स्वतःच्या खासगी मोबाइलमध्ये, तर समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण (सर्व रा. बागलवाडी) यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये मतदान केंद्रातील परिस्थितीचे अनाधिकाराने चित्रीकरण केले. याबाबत, पोलिस नाईक मोहसीन इकबाल सय्यद यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर