शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गाई वनातल्या; मात्र माणसातल्या नव्या रूपाला पाहून भारावल्या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:32 IST

Wildlife Conservation Day वन्य पशू संरक्षण दिन : बार्डीच्या अभयारण्यात वनविभागाकडून केला जातोय वन्य पशूंचा सांभाळ

ठळक मुद्देबार्डी हे दुष्काळी गाव़ परंतु या ठिकाणी २६५ एकर क्षेत्रावर घनदाट अभयारण्य आहेया अभयारण्यात लांडग्याचा अपवाद वगळता हिंस्र प्राण्यांचा वावर नाहीया अभयारण्यात एकूण वनगाई ७० आणि २५ पेक्षा जास्त काळवीट अन् हरणांची संख्या

करकंब : भूक लागलीय मुबलक चारा़़ तहान लागलीय पाणवठे आहेत़़़ कोणाचाही त्रास नाही, अगदी मुक्तपणे नैसर्गिक वातावरणात वावरतात तब्बल ७० वनगाई़ बार्डी (ता़ पंढरपूर) येथील अभयारण्यात वनगाई, हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, वानर, लांडगे आदी वन्य प्राणी गुण्यागोविंदाने मुक्तपणे वावरतात़ त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला जात असल्याने ते अन्यत्र कोठेही जात नसल्याचे वनरक्षक दिलखुश मुलाणी यांनी सांगितले.

बार्डी हे दुष्काळी गाव़ परंतु या ठिकाणी २६५ एकर क्षेत्रावर घनदाट अभयारण्य आहे़ या अभयारण्यात लांडग्याचा अपवाद वगळता हिंस्र प्राण्यांचा वावर नाही़ या अभयारण्यात एकूण वनगाई ७० आणि २५ पेक्षा जास्त काळवीट अन् हरणांची संख्या आहे. यंदाच्या हंगामात सततच्या पावसामुळे अभयारण्यात सर्वत्र चाºयाची उपलब्धता आहे़ त्या चाºयावरच वन्य प्राण्यांची गुजराण चालू आहे. परंतु जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा चाºयाची टंचाई निर्माण होते़ त्यावेळी मात्र या प्राण्यांची वणवण भटकंती सुरु होते. परंतु ती रोखण्यासाठी       वन विभाग अनेक सामाजिक       संस्था, संघटनांना आवाहन करून  चारा आणि पाण्याची सोय करते़ याशिवाय वनविभागाकडूनही ठिकठिकाणी पाणवठे तयार  केले आहेत, असे दिलखुश मुलाणी यांनी सांगितले.

तरीही शेतकºयांचे सहकार्य..बार्डीच्या अभयारण्यातील वनगाईकडून परिसरातील शेतकºयांच्या शेतीतील पिकांचे नुकसान केले जाते़ शिवाय लांडगे हे शेळ्यांना भक्ष्य बनवितात़ सतत घडणाºया या अशा घटनांमुळे आमचे नुकसान होत असले तरी आमचे सहकार्यच असते, असे शेतकºयांनी सांगितले़ तरीही वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण अभयारण्याला संरक्षक तारेचे कुंपण तयार करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूर