शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील हेल्मेट सक्ती रद्दची याचिका न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 15:09 IST

सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर ...

ठळक मुद्देजनतेच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचा आदेशजिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निर्णय बंधनकारकबॉम्बे पब्लिक अ‍ॅक्ट हा दावा चालविण्याचा अधिकार या न्यायालयास नसल्याचा निर्वाळा

सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश डी. एस. खेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने बॉम्बे पब्लिक अ‍ॅक्ट हा दावा चालविण्याचा अधिकार या न्यायालयास नसल्याचा निर्वाळा देत याचिका फेटाळून लावली. यासाठी दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानला. 

शंभूराजे सर्वधर्मीय युवा संघटनेच्या वतीने हेल्मेट सक्तीचा आदेश रद्द व्हावा व त्या आदेशावर मनाई हुकूम करण्यात यावा, यासाठी २१ डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालयात जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांविरुद्ध याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने सर्व प्रतिवादींना या याचिकेसंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना यावर म्हणणे सादर करण्याचा आदेश बजावला होता. 

 या याचिकेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आयुक्त यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी प्रशासनाच्या व तिन्ही अधिकाºयांच्या वतीने २६ अािण २४ डिसेंबर रोजी म्हणणे मांडले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये युक्तिवादासाठी २८ डिसेंबर ही तारीख नेमली होती. 

यावेळी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला होता. यात त्यांनी संबंधित याचिका प्रसिद्धी मिळविण्यासाठी दाखल केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय या याचिकेत संबंधित वादी संस्थेने त्यांची घटना व नियमावली दाखल केली नाही, याचिका दाखल केलेल्या ठरावावर अध्यक्ष व सचिवांच्या सह्या. त्यामुळे सदर वादी संस्थेला याचिका (दावा) दाखल करण्याचा अधिकार नाही. संबंधित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही. बॉम्बे पब्लिक अ‍ॅक्टनुसार संबंधित याचिका चालवण्याचा अधिकार या न्यायालयाला नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, सहा. पोलीस आयुक्त वैशाली शिंदे न्यायालयात उपस्थित होते. 

या प्रकरणात प्रशासनाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर याचिकाकर्त्याकडून अ‍ॅड. संतोष होसमनी, डी. एस. होसमनी यांनी काम पाहिले. 

जनतेच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश- सदरचा आदेश हा जनतेच्या सुरक्षिततेसाठी काढण्यात आला आहे. त्यासंबंधी शासनाकडून जनजागृती सुरू आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघात होऊन मृत्यू पावणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यावर न्यायालयाने २००४ मध्ये निकालाद्वारे एका याचिकेमध्ये हेल्मेट सक्तीचा आदेश पारित केला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च सुरक्षा समिती देखील हेल्मेट सक्तीचा आदेश राज्य शासनास व केंद्र शासनास दिलेले आहेत, असे सरकार पक्षाने स्पष्ट केले. मोटर वाहन कायदा कलम १२९ नुसार सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कलम १७७ नुसार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. १७ सप्टेंबर २००५ रोजी अधिसूचना जारी करून या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाºयांना केल्या आहेत, असेही युक्तिवादात नमूद केले. 

अपील करणार- हेल्मेट सक्तीविरोधातील याचिका सोलापूरच्या न्यायालयात फेटाळण्यात आली असली तरी या विरोधात आपण अपील करणार आहोत. न्यायालयाने तशी मुदत दिली असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. डी. एम. होसमनी व अ‍ॅड. संतोष होसमनी यांनी स्पष्ट केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निर्णय बंधनकारक- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीने घेतलेले निर्णय सर्व जनतेवर बंधनकारक असतात. यामुळे जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वतीने दिलेला आदेश जनतेच्या संरक्षणासाठी आहे. कायद्याने योग्य आहे. त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हेल्मेट सक्तीची याचिका फेटाळली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाRto officeआरटीओ ऑफीस