शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाज आर्थिक विवंचनेत; गरिबाचा फ्रीज पडला कोनाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:56 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन; आम्ही भूक कशी भागवायची...सवाल

ठळक मुद्देकरमाळा शहर, राजुरी, कुंभारगाव, पारेवाडी, खडकी, जिंती आदी गावांमध्ये माठ बनवण्याचा व्यवसायकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन राहिले आणि साहित्य बाजारात विक्रीसाठी नेता आले नाही़ ऐन पैसे कमावण्याच्या काळात त्याची विक्री झाली नाही़ पुढे उदरनिर्वाह कसा करायचा?

अक्षय आखाडे

कोर्टी : जसजसे ऊन वाढत जाते तसतसे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ग्राहकांअभावी हातावरचं संसार असलेल्या कुंभार समाजापुढे  आर्थिक संकट उभे राहिले आहे. सणासुदीच्या काळात  मातीची भांडी करून त्याच्या विक्रीतून पोट भरणाºया कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय डबघाईला आला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाया सणाला हिंदू धर्मात मातीच्या भांड्यात आंबा ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दरवर्षी नव्या केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्यासाठी कुंभार समाज मोठ्या प्रमाणात मातीची भांडी निर्माण करतो. त्यातून कुंभार कारागिराला बºयापैकी पैसे मिळतात़  यंदा तयार केलेले माठ अद्याप मागणी नसल्याने पडून आहेत़ ऐन पैसे कमावण्याच्या काळात त्याची विक्री झाली नाही़ पुढे उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न अनेक कारागिरांना पडला आहे.

उपासमारीची आली वेळ- करमाळा शहर, राजुरी, कुंभारगाव, पारेवाडी, खडकी, जिंती आदी गावांमध्ये माठ बनवण्याचा व्यवसाय चालतो. अनेक कुटुंबाची गुजराण या व्यवसायावर आहे़ मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन राहिले आणि साहित्य बाजारात विक्रीसाठी नेता आले नाही़ जत्रा आणि आठवडे बाजारात माठाची विक्री होत असते, परंतु बाजार आणि दुकानेही बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे़ यंदा एक हजार मठाची निर्मिती केली आहे़ परंतु आतापर्यंत शंभर माठ देखील विक्री झालेले नाहीत. यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा राजुरीच्या बिभीषण वाघमारे,  नवनाथ वाघमारे या व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरी