शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सावट; सोलापुरातील ४५ न्यायाधीन कैद्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:56 IST

आठ कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडणार; जे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार

ठळक मुद्दे सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या आरोपींना यापूर्वी दोन वेळा पॅरोलवर सोडण्यात आलेजे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार राज्यातील कारागृहातील शिक्षा झालेल्या आरोपींना सोडण्यात येत आहे

सोलापूर : जगभर कोरोनाने थैमान घातल्यामुळे शिक्षा झालेल्या कारागृहातील कैद्यांनाही पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा कारागृहातील ४५ न्यायाधीन कैद्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यातील कारागृहात असलेल्या न्यायाधीन कैद्यांना ४५ दिवसांच्या रजेवर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृहातील न्यायाधीन कैद्यांना सोडण्यात आले आहे. कोविड-१९ ची परिस्थिती अशीच राहिली तर त्यात पुन्हा ३0 दिवसांनी वाढ देण्यात येणार आहे. कारागृहात असलेले न्यायाधीन कैदी ज्यांना ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते अशांना ४५ दिवसांच्या पॅरोल रजेवर सोडण्यात आले आहे. राज्यातील कारागृहातील शिक्षा झालेल्या आरोपींना सोडण्यात येत आहे.

ज्या आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली आहे व ज्यांना एक वेळा पॅरोलवर सोडले होते, मात्र ते वेळेवर कारागृहात हजर झाले आहेत. अशा कैद्यांना पॅरोलवर सोडले जाणार आहे. सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या आरोपींना यापूर्वी दोन वेळा पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र जे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार आहे. 

आरोपींना सोडण्याचे आदेश झालेली कारागृहे...- येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह मुंबई, तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक, भायखळा मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह ठाणे, कल्याण जिल्हा कारागृह या आठ कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडले जात आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डी. एस. इगवे यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालय