शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लस आज येणार; सोलापुरातील १६ ठिकाणी दररोज १०० जणांना लस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 15:56 IST

पोर्टलवर नोंद असलेल्या ३८ हजार आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना पहिल्या टप्प्यातच लस देण्यात येणार

सोलापूर : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कोरोनाची लस आज बुधवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास सोलापुरात दाखल होणार आहे. १६ जानेवारीपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील १६ ठिकाणी दररोज १०० जणांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोकमत शी बोलताना सांगितली.

१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत राज्य आयोग विभागाने निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य विभाग लसीकरण करण्यासाठी सज्ज झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात अठरा बूथ निश्चित करण्यात आले आहेत. या बूथवरून प्रत्यक्ष लसीकरण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीकरणासाठी पुण्यातून बुधवारी लस घेऊन गाडी सोलापुरात पोहोचेल. सिव्हिल हॉस्पिटलमधून संबंधित बूथवर ही लस १६ जानेवारी रोजी निर्धारित केलेल्या वेळेत पोहोचवली जाईल. लसीकरणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री लवकरच केंद्रावर पोहोच करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची गडबड सुरू असतानाच आता आरोग्य विभागात लसीकरणाची घाई सुरू झाली आहे. पोर्टलवर नोंद असलेल्या ३८ हजार आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना पहिल्या टप्प्यातच लस देण्यात येणार आहे. लस दाखल झाल्यानंतर पुढील नियोजन वेगाने होणार आहे.

लस असणार ऐच्छिक

कोरोना लस सर्वांना ऐच्छिक असणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असल्यामुळे ही लस सर्वांनीच घ्यावी, असा आग्रह धरला जाणार आहे. लस सुरक्षित असल्याने कोरोना प्रतिबंधासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.

प्रमुख डॉक्टर घेणार प्रथम लस

कोरोनाची लस सुरक्षित आहे, याची खात्री सर्वांना पटावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन व प्रमुख अधिकाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणास प्रारंभ केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय