शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे निधीला कात्री; ७९२७ गरिबांचे घरांचे स्वप्न दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:11 IST

सोलापूर जिल्ह्याची अवस्था; चार योजनांची थांबली कामे

ठळक मुद्देचालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व योजनांची कामे तहकूब ठेवली फक्त आरोग्याच्या कामाला प्राधान्य दिल्याने घरकूल योजनांना निधी मिळालेला नाहीआता चालू वर्षी ३३ घरांचे काम हाती घेण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन आलेले नाही

सोलापूर : कोरोना साथीमुळे शासनाने निधी थांबविल्याने गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी असलेल्या चार योजनांची कामे थांबली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ७,९२७ लाभार्थ्यांचे काम थांबले आहे.

 झेडपीच्या जिल्हा विकास यंत्रणेमार्फत गरिबांचे सर्वेक्षण करून बेघरांना घरकूल बांधून देण्याची योजना सन २०१६-१७ पासून राबविली जात आहे. यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास व राज्य शासन पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी आवास योजनेचा समावेश आहे. प्रधानमंत्री योजनेतून २३,२५८ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यातील १७,९२३ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित ५,६०५ घरकुलांचे काम निधीअभावी थांबले आहे. 

जिल्ह्यातील पूर्ण घरकुलांची स्थिती

  • - रमाई आवास योजनेतून सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार आर्थिक वर्षात २३,२५८ घरकुले बांधणीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षीपर्यंत १०,१५६ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली. पण सन २०१९-२० या वर्षाकरिता मंजूर केलेल्या २ हजार २४५ घरकुलाच्या कामासाठी निधीच आलेला नाही. 
  • - शबरी आवास योजनेचे ५४३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. तीन वर्षांत ५०९ घरकुले बांधण्यात आली. चालू वर्षी ४४ घरकुलांच्या कामासाठी निधीच दिलेला नाही. पारधी आवास योजनेत गेल्या तीन वर्षात २१२ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यातील १७९ घरे बांधण्यात आली. 
  • - आता चालू वर्षी ३३ घरांचे काम हाती घेण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन आलेले नाही. अपूर्ण असलेल्या घरकुलांना निधी व वाळूची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे.

जागा खरेदीला दिला निधीपंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत गरिबांना घरासाठी जागा खरेदीसाठी पैसे देण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या ११९ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ४३ लाख १४ हजार १३७ रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व योजनांची कामे तहकूब ठेवली आहेत. फक्त आरोग्याच्या कामाला प्राधान्य दिल्याने घरकूल योजनांना निधी मिळालेला नाही. शासनाचे पुढील आदेश आल्यावर काम सुरू करू.    -प्रकाश वायचळ,    मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHomeघरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना