शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कोरोनाच्या भीतीमुळे सोलापूर शहरातील रक्तदानाचे प्रमाण ७० टक्के घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 1:23 PM

स्वेच्छा रक्तदाता दिन विशेष; कोरोनाची भीती हे प्रमुख कारण; जनजागरण करण्याची गरज

ठळक मुद्देथॅलेसेमिया असलेल्या मुलांना नियमितपणे रक्त लागते. त्यांची गरज भागविणे हे देखील मोठे आव्हान आहेमेडिकल हिस्ट्री, ताप, सर्दी, खोकला, रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण हे पाहिल्यानंतरच रक्त घेतले जाते

सोलापूर : कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील नागरिक रक्तदान करण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे रक्तपेढ्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील वर्षाशी तुलना करता यंदा ७० टक्क्यांपेक्षा कमी रक्तदान झाल्याचे रक्तपेढ्यांनी सांगितले.

शहरात तीन ते चार हजार ऐच्छिक रक्तदाते आहेत. रक्तपेढीकडे असलेल्या यादीतून १०० जणांना फोन करून रक्तदानाबद्दल विचारणा केल्यास फक्त पाच जणच तयार होतात. थॅलेसेमिया असलेल्या मुलांना नियमितपणे रक्त लागते. त्यांची गरज भागविणे हे देखील मोठे आव्हान आहे. रक्तदान करताना रक्तदात्याची पूर्ण तपासणी करण्यात येते. मेडिकल हिस्ट्री, ताप, सर्दी, खोकला, रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण हे पाहिल्यानंतरच रक्त घेतले जाते. 

अन्न व औषध विभागाने शिबिरे घ्यावीतअन्न व औषध विभागाने पुणे विभागातील सर्वच रक्तपेढ्यांना शिबिरे आयोजित करण्यास सांगितले होते. जुलै महिन्यापासून रक्तदान शिबिरे खूप कमी प्रमाणात आयोजित करण्यात आली आहेत. कोविड-१९च्या परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना रक्त व रक्तघटक तत्काळ मिळणे गरजेचे असल्याने रक्तदान शिबिरे घ्यावीत. याचा अहवाल सादर करावा, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने रक्तपेढ्यांना दिले आहेत.

रक्तदानासाठी आम्ही आवाहन करत आहोत. पण, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. दरवर्षी सप्टेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू असतात. शिक्षक, विद्यार्थी हे रक्तदान करतात. मात्र, शैक्षणिक संस्था सुरू नसल्याने या अडचणी निर्माण होत आहेत. तुटवडा कमी करण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे.-अशोक नावरे, प्रशासकीय अधिकारी, गोपाबाई दमाणी रक्तपेढी

दर महिन्याला २५ ते ३० शिबिरे घेण्यात येतात. सप्टेंबरमध्ये फक्त नऊ शिबिरे झाली. मागील ४ महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. आमच्याकडे थॅलेसेमियाची १२५ दत्तक मुले आहेत. त्यांना रक्त दिल्यानंतर इतर रुग्णांसाठी रक्त कमी पडते. म्हणून नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान करावे. -डॉ. शैलेश पटणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी.

टॅग्स :SolapurसोलापूरBlood Bankरक्तपेढीcorona virusकोरोना वायरस बातम्या