शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १३७ गावे कोरोनाचा हॉट स्पॉट; कडक उपाययोजनांसाठी प्रशासन अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 12:10 IST

कडक उपाययोजना : सरपंच, ग्रामसेवकांवर दिली जबाबदारी

सोलापूर : ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून आल्यावर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जादा रुग्ण आढळलेल्या १३७ हॉट स्पॉट गावांची यादी तयार केली असून, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांवर कडक उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली आहे.

सोलापुरातील संसर्ग कमी झाला आहे. तरीही ग्रामीण भागातील संसर्ग कायम राहिल्याने सोलापूर जिल्हा रेड झोनमध्येच राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सीईओ स्वामी यांनी उपाययोजना आणखीन कडक केल्या आहेत. आरोग्य विभागाकडून १ मार्च ते २० मे या काळात संसर्ग असलेल्या गावांची यादी मागवून घेतली आहे. यामध्ये महामार्गालगत व शहराजवळ असलेली गावे मोठ्या प्रमाणावर बाधित असल्याचे आढळले आहे. कामानिमित अशा गावांतील लोक सतत स्थलांतर करीत असल्याने संसर्ग कायम राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्या नेतृत्वाखाली दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती २५,५० व १०० रुग्णसंख्या असलेल्या गावांची माहिती संकलित करून रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणार आहे.

अशा होणार उपाययोजना...

जिल्ह्यातील १ हजार १३७ गावांपैकी १३७ गावांमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. अक्कलकोट तालुक्यात समर्थनगर व कडबगाव या दोनच गावात जादा रुग्ण आहेत. सतत रुग्ण आढळणाऱ्या गावांतील सर्वांची चाचणी करून पॉझिटिव्ह व संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच कोरोना उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावात शून्य रुग्ण होण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

अशी आहेत हॉट स्पॉट गावे...

  • उत्तर सोलापूर : बीबीदारफळ (रुग्ण : २१९), नान्नज (१९४), वडाळा (२४५), कळमण (१०८), रानमसले (९५), पाकणी (१३१), कोंडी (१४६), मार्डी (१८६), हिप्परगा (१०१), तिऱ्हे (१०२).
  • माळशिरस : यशवंतनगर (४६०), माळशिरस शहर (७०४), माळीनगर (२६३), मळेवाडी (२३१), शिंदेवाडी (१०६), निमगाव (१९२), संग्रामनगर (२२६), सदाशिवनगर (१५९), वेळापूर (६३९), नातेपुते (५६२), अकलूज (१४२९), गुरसाळे (१७३), मांडवे (२२७), म्हाळुंग (३२६), लवंग (१७४), श्रीपूर (२५३), धर्मपुरी (१९२), फोंडशिरस (१५५), दहिगाव (४५६), खंडाळी (१९२), संगम (१०१), चाकोरे (१४५), पिंपरी (२३१), पिलीव (१७५), पानीव (१०८), तांदुळवाडी (१४६), मळोली (१०९), मोरोची (२१०), जांबूड (१००), पिसेवाडी (१११), इस्लामपूर (१२५), कारुंडे (१८८).
  • दक्षिण सोलापूर : मंद्रुप (१५२), होटगी (१५७).
  • मंगळवेढा : मारापूर (११४), पाठकळ (१३३), भोसे (२२६), बोराळे (१९४), दामाजीनगर (२७३), मरवडे (२८१).
  • करमाळा : देवळली (१०१), वीट (२४८), करमाळा शहर (५६६)
  • बार्शी : वैराग (२६९), पांगरी (१४७), गौडगाव (१३५), बावी (१०९).
  • मोहोळ : आष्टी (१९५), पेनूर (१७३), खंडाळी (१०३), शेटफळ (१०२), अनगर (१०१), मोहोळ शहर (४४८).
  • माढा : दारफळ (१११), भोसरे (१७५), मानेगाव (१११), निमगाव (१०९), उपळाई बु. (१०७), उपळाई खु. (१२४), मोडनिंब (३४५), बैरागवाडी (१२७), तुळशी (१८९), अरण (१७९), भुताष्टे (११७), परीते (१६२), वरवडे (१०५), पिंपळनेर (१६०), निमगाव टे (१०३), कुर्डू (२२०), टेंभुर्णी (८५५), अकोले खु. (१४५), कन्हेरगाव (१०७), रांझणी (१०९), माढा शहर (२३८).
  • सांगोला : वाटंबरे (१६७), सांगोला शहर (९१७), य मंगेवाडी (१३६), कडलास (१०७), महुद (१०७), जवळा (१०५).
  • पंढरपूर : गादेगाव (४७७), उपरी (२०७), कोर्टी (२८३), वाखरी (७१३), तिसंगी (१३१), सोनके (१४७), खेड भाळवणी (१५०), कौठाळी (२७७), शहर (९५६), चळे (१९८), गोपाळपूर (४०७), मुंढेवाडी (१३९), तावशी (१९८), एकलासपूर (१२४), सिद्धेवाडी (१०२), खर्डी (२७८), टाकळी (७३४), बोहाळी (१८३), शेटफळ (१५५), तनाळी (१०३), मगरवाडी (१११), तुंगत (२५५), तारापूर (१२३), सुस्ते (३३५), शेगावदुमाला (१९५), अजनसोड (१२३), देगाव (४१४), रोपळे (२३३), आढीव (१४६), गुरसाळे (२८१), होळे (१२०), खेडभोसे (१५९), भोसे (४९९), मेंढापूर (११५), पांढरेवाडी (१०१), भानवळी (४६७), जैनवाडी (११२), पळसी (११८), पिराची कुरोली (११२), भंडीशेगाव (२६९), शेळवे (१८६), राझनी (१३४), ओझेवाडी (१७९), सरकोली (२१९), आंबे (१६३), फुलचिंचोळी (१६८), करकंब (७३६).
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य