शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला ५०० कोटींचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:15 IST

२०२० चा हंगाम संपुष्टात; पुढील दोन महिने मागणीची शक्यता नाही

ठळक मुद्देसोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला देशी मार्केटसोबत विदेशी मार्केटचीही खूप आवश्यकता नवीन आॅर्डर्स नसल्याने उद्योजक कारखाने बंद आहेतकिमान आणखीन दोन महिने अशीच स्थिती राहणार आहे

सोलापूर : कोरोनामुळे सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला जवळपास पाचशे कोटींचा फटका बसला आहे. सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाची वार्षिक उलाढाल बाराशे कोटींची आहे. डिसेंबर ते जून हा कालावधी हंगामाचा असतो. यंदाचा हंगाम पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्यामुळे या उद्योगाची ४० ते ४५ टक्क्यांची उलाढाल घटली आहे. यंत्रमाग उद्योग पूर्वपदावर यायला आणखीन दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे उद्योजक सांगताहेत. 

कोरोनामुळे देशविदेशातून मागणी खूप कमी झाली आहे. प्रतिवर्षी सहाशे ते सातशे कोटींची मागणी देशभरातील बाजारपेठांमधून येते. जवळपास चारशे ते पाचशे कोटींच्या टेक्स्टाईल उत्पादनाची निर्यात होते. देशी मार्केटला जवळपास ६०% इतका फटका बसला आहे तर विदेशी मार्केटमधून ५०% इतका फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या मागील चार महिन्यांत टेक्स्टाईल उद्योगाला नवीन आॅर्डर्स नाहीत. पुढील दोन महिन्यांपर्यंत नवीन आॅर्डर्स मिळण्याची शक्यता नाही. २०२१ सालचा सीझन डिसेंबर (२०२०) पासून सुरू होईल, अशी अपेक्षा उद्योजकांना आहे.

एकूण उलाढालीत आठ ते दहा टक्के चादर उत्पादनाचा समावेश आहे. पूर्वी चादर उत्पादनाचा वाटा जवळपास ३० ते ४० टक्के इतका होता. मागील काही वर्षांत चादरींचे उत्पादन खूपच घटले आहे. या लॉकडाऊन काळात चादरींचे अस्तित्व देखील संपुष्टात येत आहे.

सोलापुरी टेक्स्टाईलला विदेशी मार्केटची आवश्यकता...

  • - सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला देशी मार्केटसोबत विदेशी मार्केटचीही खूप आवश्यकता आहे. कोरोनामुळे दोन्ही मार्केट ठप्प झाले आहेत. त्यामुळे टेक्स्टाईल उद्योगाला अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो. 
  • - नवीन आॅर्डर्स नसल्याने उद्योजक कारखाने बंद आहेत. त्यामुळे याचा फटका यंत्रमाग कामगारांना बसतोय. कोणी पाच दिवसांचा आठवडा तर कोणी ३ दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्यामुळे कामगारांची रोजीरोटी निम्म्यावर आली आहे. 
  • - किमान आणखीन दोन महिने अशीच स्थिती राहणार आहे. शासनाने कारखानदारीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसकी यांनी व्यक्त केली.
टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगbusinessव्यवसायMarketबाजार