शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
4
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
5
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
6
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
7
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
8
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
9
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
10
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
11
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
12
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
13
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
14
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
15
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
16
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
17
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
18
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
19
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
20
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांसाठी मनपा कर्मचारी ठरले अखेरचे सोबती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:11 IST

सोलापुरात आजवर सहा जणांवर केले अंत्यसंस्कार;रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा न करणारे मनपाचे कर्मचारी

ठळक मुद्देअंत्यसंस्कार करताना मनपाचे अधिकारी, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतातएकदाच या कीटचा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा नवे कीट घेतले जातेअंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते

राकेश कदम 

सोलापूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीवर सरकारी यंत्रणेकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. सोलापुरात आजवर सहा व्यक्तींचे निधन झाले. या मृतदेहांचे दहन आणि दफन करण्याचे काम मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले आणि त्यांच्या सहकाºयांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा केली नाही. मनपाचे कर्मचारी, अधिकारी मृत व्यक्तींचे अखेरचे सोबती ठरले आहेत. 

कोरोनाग्रस्त व्यक्तीवर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. या अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपावर सोपवण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यापैकी एक-दोन लोकांना सोबत घेतले जाते. स्मशानात मनपाचे चार-पाच कर्मचारी, आरोग्य अधिकारी असतात. बाजूला पोलिसांची व्हॅन थांबलेली असते. 

 कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या व्यक्तीचे दफन करण्यात आले. त्यासाठी कर्मचाºयांनी स्मशानभूमीत जेसीबीने खड्डा खोदून घेतला. खड्ड्यात औषधे टाकून निर्जंतुकीकरण करुन घेतले. मृतदेहावर औषधांची फवारणी केली. कर्मचाºयांवर कोरोनाची दहशत होती. त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम आरोग्याधिकारी संतोष नवले, नागेश मेंडगुळे, नगरसेवक बाबा मिस्त्री आदींनी केले. दफन होईपर्यंत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त दीपक तावरे जागेच होते. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाचे दफन करण्यात आले. चार मृतदेहांचे मोदी स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य अधिकाºयांसह मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी, कल्याणी बिराजदार व इतर कर्मचारी हजर राहिले.

नातेवाईकांची अशीही भूमिकाच्काही मृत व्यक्तींच्या कुटुंबातील लोक सोबत येण्याचा हट्ट धरतात तर काही लोक तुमचे तुम्ही बघा, असेही सांगून टाकत आहेत. या मृतांसाठी मनपाचे अधिकारीच अखेरच्या प्रवासातील सोबती ठरले. अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत आयुक्त तावरे, उपायुक्त पवार यांच्यासह इतर अधिकारी सतत संपर्कात असतात. पीपीई कीटचा एकदाच वापर- अंत्यसंस्कार करताना मनपाचे अधिकारी, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतात. एकदाच या कीटचा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा नवे कीट घेतले जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस