शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही लढण्याची तयारी : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:39 IST

कुर्डूवाडी : नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे व थांबण्याचीही तयारी आहे. नेतृत्वाचा आदेश अंतिम मानून ...

ठळक मुद्देकुर्डूवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होतेकुर्डूवाडी वर्कशॉपसाठी वर्कलोडची मागणी

कुर्डूवाडी : नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे व थांबण्याचीही तयारी आहे. नेतृत्वाचा आदेश अंतिम मानून कार्यरत राहणार असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. 

जिल्ह्यात व तालुक्यात कार्यकारिणी नेमण्याविषयी पदाधिकाºयांच्या आग्रहाखातर सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा तालुक्याचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान कुर्डूवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याचा वर्कलोड व मनुष्यबळ वाढावे, यासाठी कारखाना प्रबंधक संजय साळवे यांनी देशमुख यांची भेट घेऊन कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यानंतर देशमुख यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे स्वीय सहायक प्रवीण गेडाम यांना फोनवरून संपर्क साधून कुर्डूवाडी वर्कशॉपसाठी वर्कलोडची मागणी केली. याला सकारात्मक संकेत मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले.कोर्टासाठीची जागा, ९१७ मालमत्ताधारकांचा विषय, अपर तहसील कार्यालय कुर्डूवाडी शहरात व्हावे, मंजूर असलेल्या व निधीच्या प्रतीक्षेत असलेले ट्रॉमा केअर सेंटर याबाबत भाजपचे तालुका सरचिटणीस विजयसिंह परबत व कुर्डूवाडी शहराध्यक्ष संजय टोणपे यांनी निवेदन दिले. 

यावेळी लोकसभा संघटक अविनाश कोळी, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, संघटन सचिव राजकुमार पाटील, प्रांतिक सदस्य गोविंदराव कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, अगरचंद धोका, उमेश पाटील, सागर कोले, भरत शर्मा, क्षितिज टोणपे, रेल्वे एस.सी.एस.टी. संघटनेचे महेंद्र जगताप, ए. जी. भडकवाड, अभियंता उमेश कुंभार, रेल कामगार सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वाहेद शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणElectionनिवडणूक