शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुच बिहार ट्रॉफी; सोलापुरात उद्या महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना, दोन्ही संघ सोलापुरात दाखल; सरावासाठी उतरले मैदानात

By appasaheb.patil | Updated: December 2, 2022 13:04 IST

Solapur: बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर उद्यापासून चार दिवस महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाखालील खेळाडूंची कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर -  बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर उद्यापासून चार दिवस महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाखालील खेळाडूंची कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघ सोलापुरात दाखल झाले असून दोन्ही संघांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास मैदानावर सराव केला.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाकडून सोलापूरचे आर्शिन कुलकर्णी व यश बोरामणी  यांचा समवेश असून त्यांचा खेळ आपल्या सोलापूरवासियांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी हे सामने पाहण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर यावे असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे. 

या  स्पर्धेचे उद्घघाटन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन तथा आ. रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे रियाज बागवान व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता महानगरपालिकाचे अधिकारी , स्मार्ट सिटी व सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे पदाधिकारी व सभासद प्रयत्नशील आहेत. या पत्रकार परिषदेस दतात्रय सुरवसे, चंद्रकांत रेम्बर्सू , श्रीकांत मोरे, प्रकाश भुतडा , दिलीप बचुवार - चीनीवार,  संतोष बडवे , राजेंद्र गोटे , राजन कामत आदी उपस्थित होते.  या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मार्गदर्शनाखाली विविध समितीचे नियोजन केले असून स्पर्धा प्रमुख म्हणून धैयशील मोहिते पाटील हे काम पाहणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर