शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:49 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले़

ठळक मुद्दे प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात - सीईओ डॉ. भारुड सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या - सीईओ डॉ. भारुड गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या - महाजन

सोलापूर :  सरपंच आणि पदाधिकाºयांनी आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गावाचे खºया अर्थाने नेतृत्व करावे. गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या. निश्चितच गाव तुम्हाला डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव)चे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली कार्यशाळा  जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, जि. प. सदस्या विद्युल्लता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उत्तर सोलापूरचे मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी, शाळा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.महाजन म्हणाले, आज जे स्वप्न बघत नाहीत ते काहीच करू शकत नाहीत. गावचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहावे आणि गावातील सांडपाणी व घनकचºयाचे सुयोग्य व्यवस्थापन करून आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा ध्यास घ्यावा.  सूत्रसंचालन सहशिक्षक जीवराज खोबरे यांनी केले.

वडाळ्याचा आदर्श घ्या : भारुड सीईओ डॉ. भारुड म्हणाले, पदाधिकाºयांनी गावात सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन चांगले करून प्लास्टिक बंदीची सुरुवात करायला हवी. कारण प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या आहेत. यामध्ये सांडपाण्यासाठी ३० हजारांपेक्षा जास्त शोषखड्डे घेण्यात आले आहेत. ५० गावे गटार व डासमुक्त झाली आहेत. विशेषत: विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा गावात एकूण १०१० कुटुंबांकडे १०३० इतके शोषखड्डे तयार करण्याचे अद्भुत काम केले आहे. या कामाचाही आदर्श समोर ठेवा. सोलापूर जिल्ह्यात एकही डास न दिसण्यासाठी गाव स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद