शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

लातूर कारखान्यातून वर्षभरात डब्यांची निर्मिती करणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांची माहिती, वाडी-सोलापूर मार्गावरील विकासकामांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:37 IST

लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़

ठळक मुद्देयेत्या १२ महिन्यांच्या आतच पहिला डबा तयार होऊन बाहेर पडेल अशा दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांनी दिली़ शर्मा यांनी वाडी-सोलापूर मार्गावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली़खा़ शरद बनसोडे यांनी मुख्य व्यवस्थापक शर्मा यांची भेट घेऊन सोलापूर विभागातील सेवा-सुविधांचे प्रश्न उपस्थित केले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़ येत्या १२ महिन्यांच्या आतच पहिला डबा तयार होऊन बाहेर पडेल अशा दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांनी दिली़ शर्मा यांनी सोमवारी वाडी-सोलापूर मार्गावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली़ सायंकाळी कोटणीस रुग्णालयात आयोजित केलेल्या वार्तालापात पत्रकारांशी संवाद साधत विभागात सुरु असलेल्या विकासकामांवर समाधान व्यक्त करत लातूर डबेनिर्मिती कारखान्यासह इतर विषयांवरील प्रगतीची माहिती दिली़ यावेळी सोलापूर विभागाचे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी त्यांनी सोलापूर स्थानक येत्या तीन महिन्यांत एलईडीने झळकणार असल्याचे सांगत सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे, मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार असल्याचे म्हणाले़ पूर्वी सुरक्षेसाठी विशेष निधी नव्हता, आता तो उपलब्ध होत असल्याचे म्हणाले़ यावेळी सरव्यवस्थापकांचेच मुंबईतील कार्यालय ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय होण्याबाबत चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता स्वत:चे कार्यालय सध्याच्या आहे त्याच इमारतीत राहणार असून सोबतचे इतर अधिकारी यांचे कार्यालयदेखील तेथेच राहतील म्हणाले़ मेक इंडिया अंतर्गत जपानकडून ८० टक्के रेल्वे इंजिन आणि डबे खरेदी केले जात असल्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना खूप कमी कालावधी असून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जपानकडून खरेदी होत असल्याचे सांगितले़ ---------------------खा़ बनसोडेंनी मांडले प्रवासी सुविधांचे प्रश्नदिवसभरात खा़ शरद बनसोडे यांनी मुख्य व्यवस्थापक शर्मा यांची भेट घेऊन सोलापूर विभागातील सेवा-सुविधांचे प्रश्न उपस्थित केले़ हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, असा आशावाद सरव्यवस्थापकांनी व्यक्त केला़ याबरोबरच सोलापुरातील रेल्वे रुग्णालय, नियंत्रण कक्षाची पाहणी केली़ युनियनच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले़ --------------------------दिवसभरातील घडामोडी़़़- वाडी स्थानकावर क्रू लॉबी, रनिंग रुम, टीटीई रेस्ट हाऊस इमारतीची पाहणी़- कॉगनी ब्रीज, गँग युनिट, टर्न आऊट आणि कर्वची पाहणी़- ई-सॉकेट टेस्टिंग कन्फर्मेशन प्रणालीचे प्रात्यक्षिक- मरतूर आणि गुलबर्गादरम्यान १२० कि़मी़ प्रती तासाच्या वेगाची चाचणी- गाणगापूर रोड येथे अल्ट्रा सोनिक फ्लो डिटेक्टर, टोलोड मेजरिंग डिवाईस, डिजिटल डबल रेल टेस्टर, डिजिटल सिंगल रेल टेस्टर ट्रॅकच्या दुरुस्तीची पाहणी

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Bansodeशरद बनसोडे