शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:41 IST

दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने २१ जून २०१७ पासून दूध खरेदी दरात वाढ केली आहेगाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर २७ रुपये व म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ३६ रुपये इतका दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे.राज्य शासनाने २१ जून २०१७ पासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर २७ रुपये व म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ३६ रुपये इतका केला आहे.  सहकारी संघाला हा दर देणे बंधनकारक केल्याने आम्हाला ३.५ / ८.५ दुधाला शासन आदेशाप्रमाणे दर द्यावा लागतो आहे. वरचेवर बाजारातील दूध विक्रीचा दर घसरत असल्याने संकलन केलेल्या दुधाची विक्री करणे कठीण झाले असल्याचे संघाचे अध्यक्ष आ. परिचारक यांनी सांगितले. सध्या दूध संघाचे संकलन एक लाख २५ हजार लिटर प्रतिदिन होत असून, त्यापैकी ५० हजार लिटर दूध पॅकिंगमधून विक्री केले जाते, उर्वरित दूध विक्रीसाठी दररोज अडचणीचे होत आहे.संकलन होणाºया दुधापैकी शिल्लक राहणारे दूध महानंद जानेवारीपासून २० रुपये लिटरने खरेदी करु लागला आहे. शासन अंकित महानंद जर गाईचे दूध प्रतिलिटर २० रुपयाने खरेदी करु लागला तर शेतकºयांना आम्ही किती दर द्यावा?, असा प्रश्न परिचारक यांनी विचारला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खासगी संघ व दूध पंढरीच्या दूध खरेदीत व विक्रीत मोठी तफावत असल्याने संघाला दररोज दीड लाख रुपयाचा तोटा सहन करावा लागत असून, यावर सातत्याने शासन पातळीवर चर्चा करुनही मार्ग निघत नाही.  शासन सहकारी संघाला वाढीव दर देणे बंधनकारक करीत असताना खासगी संघ त्यांना वाटेल त्या दराने दूध खरेदी करीत आहे. यावर शासन काहीच निर्णय घेत नसल्याने आता तोटा सहन करणे कठीण असल्याचे संघाचे अध्यक्ष परिचारक यांनी म्हटले आहे. ---------------------------समितीचा अहवाल गुलदस्त्यातच...?- दूध वाढीच्या कालावधीत अतिरिक्त दुधाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. यावर्षी मागणीपेक्षा अधिक दूध संकलन होत असल्याने व विक्रीची व्यवस्था नसल्याने  सहकारी दूध संघासमोर दूध विक्रीची अडचण आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अधिकाºयांची समिती नेमली होती. पशुसंवर्धन सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे व दुग्ध आयुक्त राजेंद्र जाधव यांचा समावेश होता. या समितीने राज्यातील एकूणच दुधावर अहवाल तयार करून द्यावयाचा होता. समितीचे अध्यक्ष विकास देशमुख हे सेवानिवृत्त झाले असून जाता-जाता त्यांनी अहवाल दिला असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल गुलदस्त्यातच आहे. -----------------------ंअनुदानही मिळेना- शेजारच्या कर्नाटक राज्यात सहकारी दूध संघ दुधाला त्या-त्या परिस्थितीप्रमाणे दर देतो. शासन सहकारी संघाला दूध घातलेल्या शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपयाप्रमाणे रक्कम जमा करते. यामुळे कर्नाटकमध्ये जवळपास संपूर्ण दूध शासकीय डेअरीला जमा होते. अशाच पद्धतीने अन्य राज्यातही शासन सहकारी संघाला दूध घालणाºया शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करतात. महाराष्टÑातही अशाच पद्धतीने अनुदानाची मागणी राज्यातील सहकारी संघांनी केली असली तरी त्याचा विचार शासनाने केला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrashant Paricharakप्रशांत परिचारक