सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी हारअरुण बारसकर - आॅनलाईन लोकमत सोलापूरजिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची मोठी हार झाली असून, भाजपाची सदस्य संख्या शून्यावरुन १५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ पैकी आठ पंचायत समित्यांवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व अवघ्या तीनवर आले आहे. भाजपाला चार तर शिवसेनेला दोन पंचायत समित्यांवर झेंडा फडकविण्याची संधी मिळाली आहे.जिल्हा परिषदेच्या ६८ व पंचायत समितीच्या १३६ जागांचे निकाल पूर्ण झाले असून, जिल्हाभरात मोठा बदल झाला आहे. मागील पाच वर्षांपासून एकसंघ राष्ट्रवादीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. त्याचे परिणाम वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे हे भाजपा पुरस्कृत प्रशांत परिचारक यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक कोंडीच्या निमित्ताने मोहिते-पाटील विरोधी वातावरण तयार होण्यास संधी मिळाली. सांगोल्यात माजी आ. शहाजी पाटील, मंगळवेढ्यात समाधान आवताडे, मोहोळमध्ये विजयराज डोंगरे, बार्शीत माजी आ. राजेंद्र राऊत, पंढरपूरमध्ये आ. प्रशांत परिचारक, माळशिरसमध्ये उत्तम जानकर व अन्य नेत्यांची मोट निवडणुकीपूर्वीच बांधण्यास संजय शिंदे यांना यश आले होते. त्या-त्या तालुक्यातील स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी करुन निवडणुका लढविण्याचे व जिंकण्याच्या झालेल्या प्रयत्नाला माळशिरस वगळता अन्य तालुक्यात यश आले आहे. सध्या माढा, मोहोळ, करमाळा व पंढरपूर या पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मंगळवेढा पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. आता माळशिरस व माढा पंचायत समितीवर राष्ट्रवादी तर अक्कलकोट या एकमेव पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. -----------------------------------भाजपाला चार पं.स. वर संधीभारतीय जनता पक्षाला जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर सत्ता मिळविण्याची संधी मिळाली आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर व दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर भाजपाची सत्ता येण्याची संधी आहे. उत्तर तालुक्यात भाजपा-राकाँ युतीचे तीन सदस्य तर काँग्रेसचा एक सदस्य विजयी झाला आहे. दक्षिण तालुक्यात भाजपाचे सहा, शिवसेना एक व काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आले आहेत. पंढरपूर व बार्शी पंचायत समितीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत आहे.---------------------------------* करमाळा, मंगळवेढा सेनेकडेकरमाळा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ६, माजी आ. जयवंतराव जगताप गटाचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून आले आहेत. करमाळ्यात आ. नारायण पाटील व माजी आ. जगताप यांनी एकत्रित निवडणूक लढवली. मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या आघाडीचे पाच सदस्य विजयी होऊन स्पष्ट बहुमत आहे. आवताडे आज तरी शिवसेनेत आहेत. * मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे ३४, काँग्रेसचे १५ तर राष्ट्रवादी- काँग्रेस पुरस्कृत व आघाडीचे उर्वरित सदस्य होते. * नव्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे २३, भाजपाचे १५, काँग्रेसचे ७ व शिवसेनेचे पाच सदस्य तर स्थानिक आघाड्यांचे २१ व दोन अपक्ष सदस्य येणार आहेत. * राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे २६ सदस्य असल्याचा दावा केला असून, सांगोल्यातून शेकाप सोबतच्या आघाडीतून आलेले दोन, रणजित शिंदे व चिन्हावर आलेले २३ असे २६ सदस्य असल्याचे सांगितले.* माजी जि.प. सदस्य बळीराम साठे, माजी उपाध्यक्ष संजय शिंदे व माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे जि.प. मध्ये पाच वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य सुरेश हसापुरे व शिवाजी कांबळे अनुक्रमे काँग्रेस व अपक्ष म्हणून लढले व हरले.-----------------------------------शिंदे व मोहिते कुटुंबातील आठ सदस्यखासदार विजयसिंह मोहिते-पाटील कुटुंबातील शीतलदेवी व स्वरुपाराणी या जि.प. तर अर्जुनसिंह व त्यांच्या पत्नी वैष्णवीदेवी हे पंचायत समितीवर विजयी झाले. आमदार बबनराव शिंदे कुटुंबातील संजय शिंदे व रणजित शिंदे जि.प. तर धनराज व विक्रम शिंदे पंचायत समितीवर विजयी झाले. -----------------------------समस्त सोलापूरकरांना मन:पूर्वक धन्यवाद देतो. आम्ही जनतेने दिलेल्या या अभूतपूर्व पाठिंब्याला सलाम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकासाचे पारदर्शी धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पारदर्शकता आणि मोदींच्या धोरणाला मिळालेली जोड घेऊन सोलापुरात शाश्वत विकासाचे व्हिजन आम्ही सार्थ करून दाखवू. ४० वर्षे मागे गेलेल्या सोलापूरचा भारतीय जनता पक्ष अनेक पटीने विकास करीत कर्तव्य बजावेल. सर्व नगरसेवकांना विकासाचे आणि पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा मंत्र व जनतेला शंभर टक्के विकासाचे वचन आम्ही देत आहोत. लोकशाहीतून निवडून आलेल्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.- सुभाष देशमुख, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री-------------------सांगोलाशेकाप आघाडी - ५राष्ट्रवादी -२, शेकाप - ३महायुती - २पंचायत समितीशेकाप आघाडी - १०पंचायत समिती - ४-------------------माळशिरसराष्ट्रवादी - ८भाजप - ३पंचायत समितीराष्ट्रवादी - १४भाजप - ७शिवसेना - १---------------------मोहोळ आघाडी - ३राष्ट्रवादी - ३पंचायत समितीआघाडी - ६राष्ट्रवादी - ६------------------अक्कलकोटभाजप - २काँग्रस - ३अपक्ष - १पंचायत समितीभाजप - ४काँग्रेस - ६अपक्ष - २------------------उत्तर सोलापूरराष्ट्रवादी - १भाजप - १पंचायत समितीराष्ट्रवादी-भाजप - ३काँग्रेस - १------------बार्शीभाजप - ३राष्ट्रवादी - ३पंचायत समितीभाजप - ७राष्ट्रवादी - ५----------------करमाळाकाँग्रेस-शिवसेना युती - ४राष्ट्रवादी - १पंचायत समितीकाँग्रेस-शिवसेना - ८राष्ट्रवादी - २-----------------------दक्षिण सोलापूरकाँगे्रेस - २भाजप - २शिवसेना - १राष्ट्रवादी - १पंचायत समितीभाजप - ६काँग्रेस - ५शिवसेना - १---------------------मंगळवेढाआवताडे गट - ३भालके गट - १पंचायत समितीआवताडे - ५काँग्रेस (भालके गट) -३-------------------माढाराष्ट्रवादी - ६स्वाभिमानी - १पंचायत समितीराष्ट्रवादी - १४पंढरपूरभाजप- ४पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी - ३राष्ट्रवादी - १पंचायत समितीभाजप - ७पंढरपूर-मंगळवेढा वि. आघाडी - ४राष्ट्रवादी - २काँग्रेस - १शिवसेना - १भीमा परिवार - १
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी हार
By admin | Updated: February 24, 2017 18:27 IST