शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाेगस कागदपत्रे रंगवली, माजी तालुकाध्यक्षांचा आराेप

By राकेश कदम | Updated: June 9, 2023 13:36 IST

टिळक भवनासमाेर आंदाेलनाचा इशारा

काॅंग्रेसचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जुगलकिशाेर प्रजापती आणि चैतन्य पुरंदरे यांनी बाेगस कागदपत्रांद्वारे तालुकाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया राबविली. या निवडणुकीची कागदपत्रे सादर करा अन्यथा मुंबईतील टिळक भवनासमाेर आंदाेलन करू, असा इशारा काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार, माढ्याचे साैदागर जाधव यांनी दिला आहे. 

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच काॅंग्रेस तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या. या निवडी काही तालुक्यातील नेत्यांना मान्य नाहीत. या माजी तालुकाध्यक्षांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना निवेदन पाठविले आहे. काॅंग्रेसची जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया बाेगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा आराेप या नेत्यांनी केला आहे. या निवडणूक प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्यात यावीत. या निवडींमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना डावलण्यात आल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

या पत्रावर सांगाेल्याचे सुनील भाेरे, पंढरपूरचे अमरजीत पाटील, माेहाेळचे सुरेश शिवपुजे, बार्शीचे तानाजीराव जगदाळे यांच्या सह्या आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्याकडून कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळेच आंदाेलनाचा इशारा दिल्याचे साैदागर जाधव यांनी सांगितले. काॅंग्रेसची एक घटना आहे. या घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. या निवडीवर अविश्वास दाखविणे म्हणजे पक्षाच्या घटनेवर अविश्वास दाखविणे आहे. सर्वच तालुकाध्यक्षांनी काम सुरू केले आहे. आमचा संघर्ष आता भाजपसाेबत आहे. आता आम्हाला यावर काही बाेलायचे नाही. प्रदेश काॅंग्रेसचे नेतेच तक्रारदारांच्या निवेदनावर निर्णय घेतील. विजय हत्तूरे, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा काॅंग्रेस कमिटी.

टॅग्स :congressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNana Patoleनाना पटोले