तीन दिवसांच्या सुटीनंतर २८ रोजी तहसील कार्यालयासमोर अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र या गर्दीत कोरोना हरवलाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सलग तीन दिवस बँकेला सुट्टी आल्याने बँका बंद होत्या तर निवडणुक खर्चासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेत खाते उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. डीसीसी बँकेची सेवा दुपारी बंद सल्याने अनेकांना अर्ज दाखल करण्यास अडचणीचा सामना करावा लागला.
या ग्रामपंचायतीची बिनविरोधसाठी चर्चा
माढा तालुक्यातील जामगाव, वडाचीवाडी (त मा), महातपूर, खैराव, अरण, सुर्ली, सुलतानपूर, चव्हाणवाडी (टे), लोंढेवाडी, उंदरगाव, केवड, वेताळवाडी ही गावे बिनविरोध होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. स्थापनेपासून बिनविरोध होणारी जामगाव ग्रामपंचायत २०१४ साली प्रथमच निवडणूक झाली, मात्र यावर्षी बिनविरोध करण्यास सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.
या ग्रामपंचयतीकडे तालुक्याचे लक्ष
आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांचे निमगाव (टें), शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांचे वाकाव, संजय कोकाटे यांचे माळेगाव, झेडपी सदस्य भारत शिंदे व झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या अरण गावातील ग्रामपंचायतीच्यादेखील निवडणुका असल्याने याकडे प्रामुख्याने लक्ष लागले आहे.
एकूण ग्रामपंचायती ८२
एकूण सदस्य संख्या ७३८
एकूण मतदान केंद्र ३३१
एकूण मतदार १,६०,५६८
पुरुष मतदार ८४,१५५
स्त्री मतदार ७६,४१३
फोटो
२८माढा०१
माढ्यातील बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये निवडणूक खर्चासाठी खाते उघडण्यासाठी अशी गर्दी झाली होती.