शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धक्कादायक..आठ वर्षांपासून नातीवर अत्याचार; वडिलाविरुद्ध विवाहित मुलीची तक्रार  

By विलास जळकोटकर | Updated: November 30, 2023 17:18 IST

पिडिता मनोरुग्ण बनली, आईनं ठाण्यात मांडली व्यथा.

सोलापूर : शाळेच्या निमित्तानं माहेरी ठेवलेल्या नातीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार विवाहित मुलीनं आपल्या वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातल्या एका परिसरात २०१५ ते २०२२ या आठ वर्षात अनेकदा अशी घटना घडल्याचे पिडितेने सांगितली असून, यामुळे आपली मुलगी मनोरुग्ण बनल्याची व्यथा फिर्यादीत व्यक्त केली आहे. या प्रकरणी भा. दं. वि. ३७६, बाल लैंगिक छळाचा (पोक्सो) गुन्हा नोंदला आहे.

यातील पिडितेच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी आपले पती, एक मुलगी व मुलगा असे जिल्ह्यातील एका गावात सासरी राहत होते. मोठी मुलगी चार-पाच वर्षाची असल्यापासून आई-वडिलांकडे राहून तेथेच शिक्षण घेत होती. ती इयत्ता ८ वी पर्यंत अभ्यासात कुशाग्र होती. इयत्ता ९ वीनंतर ती एकलकोंडी बनली. फिर्यादीच्या आईने फिर्यादीला बोलावून घेतले तेव्हा पिडित मुलीने तू गावाकडे जाऊ नको म्हणून भीती व्यक्त केली. तिच्या वागण्यातील बदलामुळे तिला फिर्यादीने गावाकडे नेले.

विश्वासात घेऊन तिला विचारणा केली असता तिने आजोबानं चार ते पाच वेळा केलल्या अत्याचाराबद्दल सांगितले. मुलीची बदनामी होईल म्हणून या प्रकाराबद्दल वाच्यता केली नाही. मुलीला स्वत:कडेच ठेऊन घेतले. गावाकडेच शाळेला घातले.

तिच्या वर्तनातील बदलामुळे डाॅक्टरांकडे दाखवले असता ती मानसिक रुग्ण बनल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर फिर्यादी कुटुंबासमवेत सोलापुरात येऊन स्वतंत्र राहू लागली. माहेरी फिर्यादीची आईही पतीच्या बाहेरख्याली वागण्याला कंटाळली होती. सतत भांडणे होत असत. म्हणून ती फिर्यादीकडे येत असे. फिर्यादीचे वडिल घरी येऊन भांडण करीत असतं. २०२२ मध्ये फिर्यादीच्या घरी पिडिता घरी एकटीच असताना तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. पिडितेने आईला या प्रकाराची माहिती दिली. तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्याकडे निघाली असता पिडितेने ‘कोणाला सांगितले तर जीवाचे बरेवाईट करुन घेईन’ अशी धमकी दिल्याने केस केली नाही. अजुनही फिर्यादीचे वडील (पिडितेचे आजोबा) वाईट नजरेने लक्ष ठेवून असल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आजोबाच्या कृत्यानं पिडिता मनोरुग्ण :

धक्कादायक घटनेने पिडिता मनोरुग्ण बनली आहे.बालवयात झालेल्या धक्कादायक घटनेमुळे आपली मुलगी मानसिक आजारानं मनोरुग्ण बनली. डॉक्टरांनी तसं निदान केलं आहे. याला वडीलच जबादार असल्याचे पिडितेची आईने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी