शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांना घरी बसून करता येणार पोलीसांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:22 IST

संकेतस्थळाची निर्मिती : महाराष्ट्र पोलीस दलाकडून सिटीजन पोर्टल कार्यान्वित

ठळक मुद्देनागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून सिटीजन पोर्टल कार्यान्वितनागरिकांना घरबसल्या तक्रार दाखल करता येणार तत्काळ संबंधित पोलीस ठाणे घेऊन संबंधितांशी संपर्क साधून फिर्याद दाखल करून घेणार

सोलापूर : एखादी तक्रार करायची असेल तर पोलीस चौकीत न जाता आता घरी बसून नागरिकांना तक्रार करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामार्फत राज्यातील सर्व नागरिकांना सिटीजन पोर्टल या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. 

नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून सिटीजन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. त्याची दखल तत्काळ संबंधित पोलीस ठाणे घेऊन संबंधितांशी संपर्क साधून फिर्याद दाखल करून घेणार आहेत.

ज्या व्यक्तींना या सुविधांचा वापर करता येत नाही त्यांना केंद्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून २३ सुविधा सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी ९ सुविधा संबंधित व्यक्तीला लॉगीन आय.डी. व पासवर्डचा वापर न करता लाभ घेता येणार आहे. इतर १४ सुविधांकरिता स्वत:चा लॉगीन आय.डी. व पासवर्ड तयार करून इतर सुविधांचा वापर करता येणार आहे. 

नोंदणी न करता पाहता येणाºया सुविधा- प्रथम खबर पाहणे (महिलांशी व संवेदनशील गुन्हे वगळता), अटक आरोपीची माहिती पाहणे, हरवलेल्या व्यक्तीची माहिती पाहणे, अनोळखी मृतदेहाची माहिती पाहणे, गहाळ झालेल्या मोबाईलची सूचना देणे आदी ९ प्रकारच्या सुविधा पाहता येणार आहेत. संकेतस्थळी नोंदणी करून उपलब्ध सुविधा-  ई-तक्रार देणे, सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव परवाना अर्ज करणे, वाहन चौकशी करणे, चारित्र्य प्रमाणपत्र विनंती अर्ज सादर करणे, इतर मिरवणूक परवाना अर्ज सादर करणे, भाडेकरू / पी.जी. माहिती देणे आदी प्रकारच्या १४ सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

आधुनिक युगात बदलत्या जगाबरोबर कामकाजात आमूलाग्र बदल होत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या संकेतस्थळामुळे नागरिकांना सहज तक्रारी करता येणार आहेत. यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा योग्य वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.- महादेव तांबडेपोलीस आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPeople's Education Societyपीपल्स एज्युकेशन सोसायटी