रुपयांचा निधी नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तहसीलदार जीवन बनसोडे यांनी ही माहिती दिली.
मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले होते, तर महापुरामध्ये जनावरे वाहून जाण्याच्याही घटना घडल्या होत्या. याबाबत मोहोळ प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासन स्तरावर सादर करण्यात आले होते. या नुकसानभरपाईपोटी मोहोळ तालुक्यातीळ शेती पिकांच्या पहिल्या टप्प्यात १७ कोटी रुपये, तर मृत झालेले तसेच वाहून गेलेल्या जनावरांसाठी आणि महापुराचे पाणी घरात घुसून झालेल्या नुकसानीपोटी ४ कोटी रुपये असा २१ कोटी रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी प्राप्त झाला होता.
---
या गावांना मिळणार निधी
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३६ गावांसाठी शेती नुकसानीपोटी १७ कोटी ३० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये ३८ कोटीं ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात शेती पिकांच्या नुकसानीसाठी मोहोळ तालुक्याला १७ कोटी ३० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. २१ हजार ६२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी पाठविण्यात आला आहे .
यामध्ये वाळूज, मिरी, वटवटे, जामगाव खु, वडदेगाव, विरवडे बु, अर्जुंनसोंड, मोहोळ, अनगर, भांबेवाडी, यल्लमवाडी, मनगोळी, भैरववाडी, शेजबाभुळगाव, कातेवाडी, नजीक पिंपरी, सय्यद वरवडे, अंकोली, औंढी, गोटेवाडी, सौंदणे, आढेगाव, परमेश्वर पिंपरी, वाघोली, वाघोलीवाडी, सोहाळे, सावळेश्वर, इंचगाव, कोथाळे, लमाण तांडा, कामती बु, दादपूर, मोरवंची, कोरवली, हराळवाडी, जामगाव बु या ३६ गावांचा समावेश आहे. या गावातील २१ हजार ६२१ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचेही तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले .
निधीपासून वंचित गावांना तिसऱ्या टप्प्यात मिळणारा निधी मिळणार आहे .