शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेच्या पंचकमिटीला आयुक्तांनी ठणकावले, जनावर बाजार यंदा दुसरीकडे हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:52 IST

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वराच्या यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराच्या समोरील जागेत भरणारा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा. सध्या तरी मी या ...

ठळक मुद्देयंदाच्या वर्षापुरते या जागेवर बाजार भरविण्यास परवानगी द्या, अशी विनंती समितीने आयुक्तांना केली गड्डा यात्रेच्या नियोजन आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वराच्या यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराच्या समोरील जागेत भरणारा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा. सध्या तरी मी या जागेवर बाजार भरविण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी देवस्थान समितीला सांगितले आहे. यंदाच्या वर्षापुरते या जागेवर बाजार भरविण्यास परवानगी द्या, अशी विनंती समितीने आयुक्तांना केली आहे. 

सिध्देश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या नियोजन आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली. होम मैदानाचे यंदा सुशोभीकरण झाले आहे. त्याला बाधा होऊ नये, अशी अट मनपा प्रशासनाने घातली आहे. मैदानाच्या सुशोभीकरणाला धक्का न लावता मैदानावर स्टॉल उभारण्यात येतील, अशी ग्वाही पंचकमिटीच्या सदस्यांनी दिली.

यंदा होम मैदानावर भाविकांना वाहने आणता येणार नाहीत. त्यामुळे नॉर्थकोट प्रशालेच्या मागील बाजूची जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने केली. देवस्थान समितीने होम मैदानावर स्टॉल उभारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा प्रशासन निर्णय घेणार आहे.  या बैठकीस पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, काशीनाथ दगोर्पाटील, शिवकुमार पाटील, मल्लिकार्जुन कळके, डॉ. राजशेखर येळीकर व सुरेश फलमारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकºयांना जनावरे, पाणी व चाºयाअभावी सांभाळणे अवघड झाले आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांचा बाजार लवकरात लवकर भरावा, अशी सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्मार्ट सिटी प्रकल्पातून होम मैदानावर करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या कामाला कुठेही धक्का न लावता श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर मनोरंजनाची साधने व स्टॉल उभारण्यात येतील. या मैदानाचे सौंदर्य जपण्यासाठी यात्रेकरूंकडूनही सहकार्य अपेक्षित आहे.- धर्मराज काडादी, अध्यक्ष, देवस्थान पंचकमिटी 

सध्याच्या स्थितीत तरी जुन्या जागेत जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी दिलेली नाही. दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि आमची बैठक होईल. त्या बैठकीनंतर निर्णय कळविला जाईल. - डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीर