शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक बातमी; जनआरोग्य योजनेमुळे कोरोनावर उपचार परवडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:08 IST

न्यूमोनियासह २० लक्षणांचा समावेश : १ कोटी ३४ लाखांची बिलं जमा

ठळक मुद्देजिल्ह्यात या योजनेत समाविष्ट असलेली ४१ रुग्णालये आहेत१८ रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेतील कोविड-१९ चे रुग्ण अ‍ॅडमिट करण्यास परवानगीआता कोरोना निदानासंबंधित २० बाबींचा समावेश करण्यात आला

सोलापूर : न्यूमोनियासह कोरोनाची लक्षणे असलेल्या २० आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याने गरिबांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत जिल्ह्यातील १८ हॉस्पिटल असताना फक्त ७ हॉस्पिटलने दिलेले ५१४ प्रस्ताव या योजनेत मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ ५१४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात फायनल झालेल्या बिलापोटी संबंधित खासगी व सरकारी रुग्णालयांना १ कोटी ३४ कोटींचे बिल जमा करण्यात आले आहे.

सोलापुरात १८ रुग्णालयांत सोयजिल्ह्यात या योजनेत समाविष्ट असलेली ४१ रुग्णालये आहेत. पण यातील फक्त १८ रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेतील कोविड-१९ चे रुग्ण अ‍ॅडमिट करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अकलूज: क्रिटिकल, देवडीकर, कदम, पंढरपूर: जनकल्याण, कुंभारी: अश्विनी ग्रामीण, बार्शी: जगदाळे, सोलापूर: सिव्हिल हॉस्पिटल, चिडगुपकर, गंगामाई, लोकमंगल, यशोधरा, युगंधर, अश्विनी, मार्कंडेय, धनराज गिरजी, मोनार्क, महिला, चंदन.

या आजारांचा समावेशपूर्वी या योजनेत आठ आजार होते. आता कोरोना निदानासंबंधित २० बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाच्या लक्षणावरून एम ३क्यू १.३ व एम ३ क्यू १.८ चे निदान असलेल्यांना ५० हजार. एम ३ क्यू १ लक्षणे असलेल्यांना १ लाख २० हजार, एम ३ क्यू १.४ च्या रुग्णास ६५ हजार, १.५ च्या रुग्णास १ लाख, नेप्रोलॉजी: ३५ हजार, पुलमोनोलॉजी: २५ व ५० हजार अशा आठ प्रकारांचा पूर्वी समावेश होता. आता २० ते ८५ हजारांचे पॅकेज देण्यात आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य