शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक; प्रतिबंधित भागात एचआयव्ही बाधितांनाही घरपोच औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 15:33 IST

सोलापूर शहरात ११ प्रतिबंधित क्षेत्र; कोरोना बाधितांची संख्या वाढली

ठळक मुद्देफक्त सोलापूर शहर किंवा जिल्ह्यातील रुग्णांनाच नव्हे तर इतर रुग्णांनाही औषधे देण्यात येत आहेतलॉकडाऊनमुळे दुसºया जिल्ह्यातील रुग्ण सोलापुरात अडकला असेल तर त्यालाही सोलापुरातील केंद्रामधून औषधे देण्याची सुविधाज्या जिल्ह्यात आहेत तेथील एआरटी केंद्राकडे सोलापुरातून औषधे दिल्याची माहिती कळविण्यात येते

सोलापूर : शहरामधील कन्टेन्टमेंट झोनमध्ये असणाºया रुग्णांना एआरटी सेंटरमध्ये जाऊन औषधे घेणे अवघड झाले आहे. याचा विचार करुन या रुग्णांना २७ एप्रिलपासून घरपोच औषधे देण्यात येत आहेत.

कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कन्टेन्टमेंट झोनचीदेखील संख्या वाढताना दिसत आहे. या परिसरामधील एचआयव्ही बाधितांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी प्लस सेंटरमध्ये जाऊन औषधे घेताना अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून या रुग्णांना घरपोच जाऊन औषधे देण्यात येत आहेत.

कन्टेन्टमेंट परिसरात रुग्णालयाच्या व्हॅनमधून एक समुपदेशक व एक कर्मचारी जातो. तिथे संबंधित रुग्णाला फोन करुन बोलावले जाते. तो रुग्ण आल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्याला औषधे दिली जात आहेत. या परिसरात जाताना कर्मचारी हे शारीरिक अंतर पाळत मास्क, ग्लोव्हज घालून जातात. तालुकास्तरावरही अशी सुविधा दिली जात आहे. तालुकास्तरावर ४८७ रुग्ण, इतर एआरटी सेंटरमधील १९४ रुग्ण, शहरातील ३३ व कन्टेन्टमेंट झोनमधील १६ रुग्णांना औषधे देण्यात येत आहेत. जोपर्यंत लॉकडाऊन सुरु असेल तोपर्यंत सेवा देण्यात येणार आहे.---------------फक्त सोलापूर शहर किंवा जिल्ह्यातील रुग्णांनाच नव्हे तर इतर रुग्णांनाही औषधे देण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे दुसºया जिल्ह्यातील रुग्ण सोलापुरात अडकला असेल तर त्यालाही सोलापुरातील केंद्रामधून औषधे देण्याची सुविधा आहे. ते ज्या जिल्ह्यात आहेत तेथील एआरटी केंद्राकडे सोलापुरातून औषधे दिल्याची माहिती कळविण्यात येते.- डॉ. अग्रजा चिटणीस, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी प्लस सेंटर, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधं