शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

दिलासादायक; सोलापुरात दररोज तयार होत आहेत १ हजार जम्बो सिलेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 17:26 IST

कोरोनाशी दोन हात; सोलापूर शहर, जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा व पुरवठा

सोलापूरसोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.                                                                            जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज शहर आणि जिल्ह्यातील डेडीकेटेड कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियुक्त समितीच्या सदस्य, ऑक्सिजन उत्पादक, हॉस्पिटलचे संचालक यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठक जिल्हाधिकारी निवासस्थानातील दालनात झाली. बैठकीला सोलापूर महापालिका उपायुक्त धनराज पांडे, उद्योजकता विकासचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, सह अधिष्ठाता डॉ. पुष्पा अगरवाल, औषध  प्रशासन निरीक्षक एन. एस. भालेराव आदी उपस्थित होते.                                                                                 श्री. शंभरकर यांनी सांगितले की, शहरात इतर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र सर्व हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होईल, यासाठी नियोजन केले आहे.                                                              जिल्ह्यात सध्या एल.आर. इंडस्ट्रीज आणि आर्निकेम इंडस्ट्रीज येथे ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे आठशे ते एक हजार जम्बो सिलिंडर उत्पादन केले जाते. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी येथील  एस. एस. बैग्ज अँड फिल्टर्स प्रकल्प उद्यापासून सुरु केला जाणार आहे. त्यामुळे आणखी पाचशे सिलिंडर उत्पादन वाढेल, असे त्यांनी सांगितले.  

सोलापुरातील ऑक्सिजनची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बेल्लारी जिल्ह्यातील उत्पादकांशी संपर्क साधला आहे. यासाठी बेल्लारी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करण्यात येईल. नागरिकांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही शशंभरकर यांनी केले.

बैठकीला मार्केंडय हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, आर्निकेमचे राहुल आराध्ये, एल आर इंडस्ट्रीजचे शेषगिरी देशपांडे, प्रभाकर भिमनपल्ली, परेश मनलोर, मल्लिकार्जुन होनमाने आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या