शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; मेसचा डबा खाऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी करतात रोज काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:48 IST

फॅमिली महिनाभरापासून पाचशे किलोमीटर दूर; विश्रामगृहातच असतो मुक्काम

ठळक मुद्देजिल्हाधिकारी शंभरकर यांचा पदभार घेतल्यापासून डाक बंगल्यातच मुक्काम राजेंद्र भोसले यांच्या बदलीनंतर त्यांनी पदभार घेतलामुलांच्या परीक्षा असल्याने त्यांचे कुटुंबीयही मुंबईलाच राहिले

सोलापूर : जिल्ह्याला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाºया जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा मुक्काम डाक बंगल्यात आहे. दीड महिन्यापासून कुटुंबापासून दूर राहून मेसचा डबा तर कधी इतर अधिकाºयांनी पाठविलेले जेवण घेत दिवसभराच्या बैठकांमध्ये ते व्यस्त राहत आहेत.

जिल्हाधिकारी शंभरकर यांचा पदभार घेतल्यापासून डाक बंगल्यातच मुक्काम आहे. राजेंद्र भोसले यांच्या बदलीनंतर त्यांनी पदभार घेतला खरा, पण तेव्हापासून ते नूतन पालकमंत्री व विभागीय आयुक्त आणि मंत्रालयाच्या बैठकांमध्ये महिनाभर व्यस्त राहिले. दरम्यान भोसले यांनी महावितरणकडे झालेली बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याने ‘शिवदर्शन’ हा बंगला लवकर रिकामा केला नाही. दुसरीकडे नियुक्ती मिळाल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी हा बंगला रिकामा केला. त्यानंतर बांधकाम विभागाने बंगल्याची रंगरंगोटी सुरू केली. यादरम्यान मुलांच्या परीक्षा असल्याने त्यांचे कुटुंबीयही मुंबईलाच राहिले होते. बंगल्याची रंगरंगोटी सुरू असतानाच कोरोनाच्या साथीचे काम सुरू झाले. यामुळे रंगरंगोटीचे कामगार निघून गेले. त्यामुळे शंभरकर यांना बंगला मिळालाच नाही.

त्यामुळे डाकबंगल्यातच  मुक्काम करून दिवसभर कोरोना साथीच्या लढ्याच्या तयारीला ते जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. रात्री उशिरापर्यंत विविध विभागांच्या बैठका यामुळे त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देता आला नाही.

असा आहे दिनक्रम- डाक बंगल्यात मुक्काम असल्याने ते मेसचा डबा खातात. सकाळी नाश्ता केल्यानंतर कार्यालयाकडे जात असतानाच सोबत डबा नेतात.  दुपारी तीन किंवा चार वाजता भोजन होते. त्यानंतर रात्री परतल्यावरच साधा आहार ते घेतात.अधिकारी आणतात डबा- डाक बंगल्यात ते एकटेच राहतात याची बºयाच जणांना माहिती असल्याने रात्री त्यांना भेटावयास येणारे अधिकारी डबा आणतात. त्यांच्याबरोबर ते जेवण शेअर करतात. महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव हे आवर्जून त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी येतात.

टॅग्स :Solapurसोलापूरcollectorजिल्हाधिकारीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस