शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी होम क्वारंटाईन झाल्याने सोलापुरातील सिव्हील पोलीस चौकी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 15:23 IST

पहिल्यांदाच लागले कुलूप : जखमींची नोंद आता थेट सदर बझार पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देपोलीस कर्मचाºयांची काळजी म्हणून पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून  सिव्हिल पोलीस चौकी बंद करण्यात आली शासकीय रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची नोंद आता थेट सदर बझार पोलीस ठाण्यात केली जाईलसिव्हिल पोलीस चौकीत दोन पाळ्यांमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत

सोलापूर : शासकीय रुग्णालयातील कर्मचाºयांना व काही डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने आतमध्ये असलेली सिव्हिल पोलीस चौकीही बंद करण्यात आली आहे. जखमींची नोंद आता थेट पोलीस ठाण्यात होत असून, पहिल्यांदाच चौकीला कुलूप लागल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार करणाºया काही डॉक्टर्स, नर्स, ब्रदर व अन्य कर्मचाºयांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दाखल होणाºया रुग्णांची माहिती घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात सिव्हिल पोलीस चौकी आहे. सिव्हिल पोलीस चौकीत दोन पाळ्यांमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत असतात. अपघात, जळीत, मारहाणीतील जखमी, आत्महत्या, आजाराने मृत्यू अशा कोणत्याही प्रकारचे रुग्ण, रुग्णालयात दाखल झाले की त्याची रितसर नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करावी लागते. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाल्यानंतर  त्याची माहिती घटनास्थळ घडलेल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्याला कळवली जाते. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयातील कर्मचाºयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनानेही आपल्या कर्मचाºयाची काळजी म्हणून आतमध्ये असलेली पोलीस चौकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी रात्री १0 वाजता अचानक सिव्हिल पोलीस चौकी बंद करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ सिव्हिल पोलीस चौकी बंद केली आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच  पोलीस चौकीला कुलूप लावण्यात आले आहे.

सदर बझार पोलीस ठाण्यात होतील नोंदी : साळुंखे- पोलीस कर्मचाºयांची काळजी म्हणून पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून  सिव्हिल पोलीस चौकी बंद करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची नोंद आता थेट सदर बझार पोलीस ठाण्यात केली जाईल. तशा सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या आहेत.

पोलीस कर्मचारी झाले होम क्वारंटाईन- सिव्हिल पोलीस चौकीत दोन पाळ्यांमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhospitalहॉस्पिटल