शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शहर मध्यमध्ये शिवसेना वारंवार अपयशी, आता भाजपकडून आमचा दावा राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:59 IST

पालकमंत्री विजयकुमार देशमुख; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले जोरदार शक्तिप्रदर्शन

ठळक मुद्देसोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमीमागच्या निवडणुकीत शिवसेना तिसºया क्रमांकावर होतीभाजपने मात्र या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी होत गेली आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. भाजपने मात्र या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. या मतदारसंघात भाजपचे १८ नगरसेवक असल्याने यावर भाजपच दावा करणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाºयांचा मेळावा बुधवारी सायंकाळी मर्दा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, शशी थोरात, अनंत जाधव, चंद्रकांत रमणशेट्टी, पांडुरंग दिड्डी, महिला अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, विस्तारक प्रकाश म्हंता, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश वल्याळ, मोहिनी पत्की, मंगला पाताळे, परिवहन सदस्य जय साळुंखे, रामचंद्र जन्नू आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

देशमुख म्हणाले, युतीचे जागावाटप दोन दिवसांत निश्चित होईल. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी होत आहे. दुसरीकडे भाजपची वाढत आहे. शहर मध्य मतदारसंघावर भाजप दावा करणार आहे. सर्वांनी गटतट विसरुन काम करायला हवे. विक्रम देशमुख म्हणाले, भाजपचे या मतदारसंघातील काम इतर मतदारसंघाच्या तुलनेत अतिशय चांगले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा. 

यावेळी नागेश वल्याळ यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. शहर मध्य मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली.

मेळाव्याला बसवराज गदगे, संदीप जाधव, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, पिंटू महाले, मल्लेश सरगम, हिरालाल पिसे, अरविंद साका, गंगाधर गुल्लापल्ली, भीमाशंकर जावळे, सिद्धार्थ मंजेली, संध्या सिद्धम, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, श्रीकांचना यन्नम, राधिका पोसा आदी उपस्थित होते.

प्रणिती शिंदेंची दादागिरी मोडीत काढणार - जाधव - आमदार प्रणिती शिंदे यांचा पराभव अटळ असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून त्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. त्यांची दादागिरी मोडीत काढू. शिंदे यांनी मतदारसंघात मेकअपचे बॉक्स वाटण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीचा मेकअप करावा. सहानुभूती मिळविण्यासाठी खटाटोप करु नये, अशी टीकाही जाधव यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण